नगर मनमाड रस्त्यावर अपघातात एक ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नगर मनमाड रस्त्यावर ,निबंळक शिवारात अपघाता एक वृध्द ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची अधिक माहिती अशी कि फिर्यादी ज्ञानेश्‍वर मोतीराम भिल्ल (रा.सिंदखेडा,जि.धुळे ,) यांचे वडील मोतीराम नानका भिल्ल हे पिक अप गाडीतून लहान मुलास खाली उतरवत असतांना दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मनमाडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने फिर्यादीच्या वडीलांना निंबळक शिवारात पाठीमागुन जोराची धडक दिली . या धडकेत गंभीर दुखापत झाल्याने मोतीराम नानका भिल्ल यांचा मृत्यू झाला. यावेळी अज्ञात कार चालक घटनास्थळा वरून पसार झाला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.