‘संघा’वरील चित्रपटासाठी भाजप करणार १०० कोटींचे फंडींग !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आतापर्यंत बाहुबलीसह अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या कथा लिहिणारे लेखक विजयेंद्र प्रसाद हे लवकरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास दाखवणारी कथा लिहिणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भाजप स्वतः या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवणार आहे. 


संघाची स्थापना ते आतापर्यंतचा त्यांचा प्रवास चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च उचलण्याची तयारी भाजपने दाखवली असून हा प्रोजेक्ट सुमारे १०० कोटी रुपयांचा असणार आहे. संघाच्या समोर आलेली संकटे आणि त्यांच्या यशापयशावर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात येणार आहे. या चित्रपटासाठी बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार्सचा विचार केला जात आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.