शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या छिंदमची सुटका;अज्ञातस्थळी रवाना.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमला जामीन मंजूर झाल्याने त्याची आज नाशिक कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने छिंदमला सशर्त जामीन मंजूर केला आहे.

शिवाजी महाराजांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा छिंदमवर दाखल आहे. या दोन्ही गुन्ह्यात शुक्रवारी त्याला सशर्त जामीन मंजूर केला होता. अखेर नाशिक कारागृहातून आज दुपारी त्याची सुटका करण्यात आली. मात्र त्यानंतर तो अज्ञातस्थळी गेल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या छिंदमने जनक्षोभ उसळल्यावर व्हिडिओ प्रसारित करुन जनतेची माफी मागितली होती. मात्र, आता छिंदमनं ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली आहे. छिंदमनं मी निर्दोष असून राजकीय अकसापोटी मला गुंतवण्यात आल्याचं आपल्या जामीन अर्जात म्हटलं होतं. त्याचबरोबर, “मी घरातील एकमेव कर्ता पुरुष आहे. आई आजारी असून, दोन लहान मुले असल्यानं देखभालीसाठी जामीन मिळावा.” असंही म्हटलं होतं.

सरकारी वकिलांनी छिंदमच्या जामिनाला तीव्र आक्षेप घेतला होता. छिंदम बाहेर आल्यास तपासावर दबाव आणण्याची आणि पुरावा नष्ट करण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून जामीन मंजूर केला. त्यामुळे जेल प्रशासनाने त्याची सुटका केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.