जामखेड मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पिडित मुलगी चार महीन्यांची गरोदर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड तालुक्‍यातील राजुरी येथील एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीने 17 वर्षीय मुलाने वेळोवेळी अत्याचार केला. त्यातून ती चार महिन्यांची गर्भवती राहिल्याचे नुकतेच उघड झाले. मुलीचे आईवडील ऊस तोडणी कामगार आहेत. आजीआजोबांकडे असलेल्या मुलीला दमदाटी करून तिच्यावर त्या मुलाने अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जामखेड तालुक्‍यात खळबळ उडवून देणाऱ्या घटनेबाबत अधिक माहिती अशी, पिडीत मुलीचे आईवडील ऊसतोड कामगार आहेत. ऊस तोडणीच्या कामातून येणाऱ्या पैशावर त्यांचा व कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही पीडित मुलीचे आईवडील मुलीला राजुरी गावात आजीआजोबांकडे शिक्षणासाठी ठेवून दिवाळी सणानंतर सातारा जिल्ह्यातील कापसी साखर कारखान्यावर ऊस तोडणीसाठी गेले होते.

पिडीत मुलगी गावातीलच शाळेत इयत्ता 7 वीच्या वर्गात शिकत आहे. त्यांच्याच शेजारी राहणारा एक सतरा वर्षाचा मुलगी नेहमी घरी येत-जात होता. त्या मुलाने घरी कोणी नसताना मुलीवर वेळोगवेळी अत्याचार केला. ऑक्‍टोबर 2017 पासून ते 9 मार्च 2018 पर्यंत त्याने मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच कोणाला काही सांगितल्यास जीवे मारून टाकेल, अशी धमकीही त्याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मुलीने हा प्रकार आजीआजोबांना सांगितला. यानंतर मुलीला खाजगी दवाखान्यात दाखल केले असता ती गर्भवती असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी आरपीआयच्या प्रदेश महिला उपाध्यक्षा शांताबाई लोंढे यांना ही हकीगत सांगितली. यानंतर त्यांनी पिडीत मुलीस पोलीस ठाण्यात आणून आरोपी विरोधात रितसर तक्रार दाखल करण्यास सांगितले. 

यानंतर पिडीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या मुलाविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात बलात्कार व बाललैंगिक आत्याचार प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.