श्रीगोंद्यात कत्तलीसाठी गायींची वाहतूक करणारा टेम्पो पकडला,दोघे अटकेत.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कत्तलीसाठी दोन जर्सी आणि दोन गावरान गायी घेऊन जात असलेला टेम्पो (एमएच ४२ ए एफ ०२४३) जप्त करत पोलिसांनी विनायक भगवान भांड आणि अशोक भगवान मखरे यांना अटक केली. श्रीगोंदे शहरातून कत्तलीसाठी गायींची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर श्रीगोंदे ते दौंड रस्त्यावर पोलिसांनी ११ रोजी रात्री सापळा लावला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मध्यरात्री साडेबारा वाजता शहरातून जाणाऱ्या बोलेरो पिकअप टेम्पोची तपासणी केली असता त्यात गायी आढळल्या. या गायी आणि टेम्पो मिळून १ लाख २० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत सुनील गोविंद मखरे, अतीक गुलाब कुरेशी, मुनाफ गुलाब कुरेशी आणि अनोळखी व्यक्तीच्या विरोधात प्राणी संरक्षण कायदा कलम १९६० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या गुन्ह्यातील अतिक आणि मुनाफ यांच्यावर यापूर्वीदेखील गायींची कत्तलीसाठी वाहतूक केल्याचा गुन्हे दाखल आहे. गोरक्षकांवर प्राणघातक हल्ला केला, म्हणूनही गुन्हा दाखल आहे. तपास पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार करत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.