प्रताप काका आता तुम्ही लढाच ! कार्यकर्त्यांचा जोरदार आग्रह

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी येथे दि २५ मार्च रोजी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एकलव्य शिक्षण संस्थेचा सुवर्णमहोत्सवी सोहळा व माजी आ माधवराव निऱ्हाळी यांच्या पुतळा अनावरण तसेच माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचा गौरव सोहळ्याचे जाहीर निमंत्रण देण्यासाठी बालमटाकळी येथे प्रतापराव ढाकणे यांनी सर्वपक्षिय कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
बैठकीत प्रतापराव ढाकणे यांनी कार्यक्रमाचे निमंत्रण देवून उपस्थित राहण्याचे आह्वान केले तसेच बोलताना म्हणाले सर्वसामन्य कार्यकर्ता हीच माजी ताकत आहे, अनेकवेळा निवडणुकीत पराभूत झालो. तरी घरात बसलो नाही संघर्ष हा माझा वारसा असून सतत लोकांच्या भूमिकेबरोबर राहिलो आहोत. आज पर्यंत सर्वाना बरोबर घेवून समाजकारण व राजकारण करून वेळोवेळी सर्वाना मदत केली हे सर्वश्रुत आहे, आता भविष्यकाळातील होणारी निवडणूक लढविण्या बाबत कार्यकर्त्यांची भावना व अग्रहानुसार योग्य वेळी निर्णय घेवू असे ढाकणे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांनी प्रतापकाका आता किती दिवस दुसऱ्यासाठी संघर्ष करायचा ? ते आता थांबवा आणि होवू घातलेल्या लोकसभा किव्हा विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढा, असा जोरदार अग्रह सर्व कार्यकर्त्यांनी झालेल्या या बैठकीत प्रत्येक कार्यकर्ता भावनिक होऊन आपली भूमिका मांडताना सांगत होता की काका तुम्ही ज्याज्या वेळेस आदेश दिला त्यावेळेस आदेशाचे पालन करून नको असणाऱ्या व्यक्तींना पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभेसाठी प्रामाणिकपणे मदत केली पण नंतर त्यातील काहींनी तुम्हाला तीव्र विरोध केला. आता झाले ते पुरे आता तुम्ही उमेदवार हवे आहेत प्रताप ढाकणे हाच आमचा पक्ष आहे म्हणून गोरगरीब, सामन्य कार्यकर्त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी काका तुम्ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढाच असा निर्धार बैठकीत बोलणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यावेळी बालमटाकळीचे उपसरपंच तुषार वैद्य, भाजपचे कासम शेख, अशोक खिळे, ज्ञानेश्वरचे माजी संचालक चंद्रकांत गरड, चंद्रकांत बागडे, सुदाम शिंदे, माजी सरपंच भानुदास गलधर, डॉ प्रकाश घनवट, बाजार समितीचे संचालक प्रल्हाद शिंदे, भाऊसाहेब पोटभरे, भगवानबाबा मल्टीस्टेटचे अध्यक्ष मयूरराजे वैद्य,अरुण शिंदे, बाळासाहेब फुंदे, मयुर हुंडेकरी, दीपक तागडे, बाळासाहेब ढाकणे म्हसू काजळे गुरजी, अशोक वैद्य अशोक काळे, मल्लारी घुले. कारभारी जावळे आदीसह ढाकणे यांना मानणारे सर्व पक्षिय कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरराजे वैद्य यांनी केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.