श्रीगोंद्यात पशुखाद्य विक्रेत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोदे तालुक्यातील मुंढेकरवाडी येथे पशुखाद्याची विक्री करणाऱ्याने सोमवारी येथील पोलिस ठाण्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतल्याने आत्मदहनाचा प्रयत्न फसला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या विक्रेत्याला अटक केली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जगन्नाथ भगवान देशमुख (महाराज) यांचा पशुखाद्य विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे बारामती येथील बारामती कॅटल फीडस या पशुखाद्य निर्मिती करणाऱ्या कंपनीची अधिकृत डिलरशीप आहे. मात्र, कंपनीकडून देशमुख यांच्यापरस्पर माल पाठवून तो दुसऱ्या दुकानदाराकडे उतरवला गेला. 

देशमुख यांना फक्त बिल आले. त्या बिलाच्या वसुलीसाठी कंपनीकडून तगादा सुरू झाला. त्यानंतर काही दिवसांनी देशमुख यांनी कंपनीला कोणतीही ऑर्डर दिली नसताना त्यांच्या नावे एमएच ४२ टी १०३४ मधून माल पाठवला गेला. हा माल काष्टी येथील एका दुकानात उतरवला गेला. तशी कंपनीकडे पोहोचही आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
असे असतानाही कंपनीने त्याचेही बिल देशमुख यांच्या नावावर टाकत वसुलीसाठी तगादा लावला. या तगाद्याला वैतागून देशमुख यांनी पोलिस ठाण्यात कोणतीही माहिती न देता पोलिस ठाण्याच्या आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.