नगर औरंगाबाद रस्त्यावर ट्रक चालकास लुटले.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगर औरंगाबाद रस्त्यावर ट्रक चालकाला तीन अनोळखींनी 35 हजारास लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या घटनेची अधिक माहिती अशी फिर्यादी भैरूलाल रामलाल खारवाले (रा. नांदवेल ता.दलोदा,जि. मंदसोर ,राज्य मध्यप्रदेश ) हे नगर औरंगाबाद रस्त्यावरील इमामपूर घाट येथील मिनाक्षी हॉटेल पांढरीपुल येथे थांबलेले असतांना पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अचानक फिर्यादीच्या गाडी नं एम पी 14 एच सी 0281 च्या पाठीमागुन एका मोटारसायकल वरून तीन अनोळखींनी येवून फिर्यादीच्या कानावर मारून फिर्यादीच्या खिशातील 35 हजार रूपयांची रोख रक्कम बळजबरीने चोरून नेल्याप्रकरणी आरोपीविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.