राजकारणा पलीकडे सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे पाहीले पाहीजे - सुजय विखे पाटील.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी राजकारणापेक्षा समाजहिताला प्राधान्य देण्याचा विचार जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पुढे घेवून जात आहोत. कोणत्याही आजाराला पक्ष नसतो,सामान्य माणसाला या आरोग्य शिबीराचा लाभ मिळावा एवढाच सामाजिक दृष्टीकोन आमचा असल्याची भूमिका पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फोंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्ट केली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शेवगाव  तालुक्यातील शहर टाकळी येथे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फोंडेशन आणि जनसेवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबीराचे उद्घाटन डॉ.विखे पाटील यांच्यासह उपसरपंचच शिवाजीराव गवळी, सदस्‍य रामभाऊ साळवे, सोसायटीचे चेअरमन अनिल मडके, डॉ.अरुण पवार, राजेंद्र काकडे,श्री.कदम, मिलींदनाना कुलकुणी, भाऊसाहेब मडके, डॉ.कानडे, राजू वैद्य, वाय.डी कोल्‍हे, बाळासाहेब घुले, आत्‍माराम फुंडकर, डॉ.गांधी, माजी उपसरपंच आण्‍णासाहेब शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, आपल्याकडे प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडण्याची सवय झाली आहे. यातून कोणतेही समाजहीत साध्य होत नाही,याकडे लक्ष वेधून पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी राजकारणापेक्षा समाजहिताला प्राधान्य दिले. तोच विचार आम्ही पुढे घेवून जात आहोत.राजकारणा पलीकडे सामान्य माणसाच्या प्रश्नाकडे पाहीले पाहीजे. आजाराला जात,धर्म आणि पंथ नसतो हा विचार आमचा आहे. म्हणूनच आरोग्य शिबीराचे आयोजन हे सामाजिक दृष्टीकोनातून असल्याचे त्यांनी नमूद केले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
आरोग्य शिबीरात मिळणारे उपचार आणि मार्गदर्शन मोफत आहेत. पण तपासणीत पुढील उपचार करण्याची वेळ आलीच तर डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फोंडेशनच्या रूग्णालयात पुढील उपचारांची सोय करण्यात येणार असल्याचे डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले. एकुन १८०० रुग्‍णांनी या आरोग्‍य शिबीराचा लाभ घेतला.शेवगाव तालुक्यातील प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी लवकरच जनसंपर्क कार्यालय सुरू करण्याची घोषणा करतानाच या कार्यालयातून सामान्य माणसाच्या प्रश्नाचा पाठपुरावा केला जाईल आशी ग्वाही त्यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.