श्रीगोंद्यात शिक्षकाला शिवीगाळ करणाऱ्यावर गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा शहरातील दत्तवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक सुभाष वनाजी रसाळ यांना वर्गात येऊन शिवीगाळ करूत, गोंधळ घालत दमदाटी केला. याप्रकरणी रसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आरोपी संतोष ऊर्फ बाल्या दिलीप मखरे रा.दत्तवाडी यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत माहिती अशी की, (दि.७ मार्च) रोजी सुभाष रसाळ व त्यांचे सहकारी शिक्षक सुनील वाकडे, हे नेहमीप्रमाणे सकाळी साडेदहा वाजता शाळा उघडून आपआपल्या वर्गात जाऊन विद्याथ्र्याना शिकवत होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास दत्तवाडी येथील राहणारे संतोष ऊर्फ बाल्या दिलीप मखरे हा रसाळ हे शिकवत असलेल्या वर्गात गेले. व त्यांनी रसाळ यांना मला विद्याथ्र्याना मारहाण होत असल्याचा आवाज आल्याचे सांगून मखरे यांनी वर्गात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. 

त्यावर रसाळ यांनी कोणत्याही विद्याथ्र्याला मारहाण झालेली नाही. तुम्ही गोंधळ घालू नका, विद्यार्थी घाबरत आहेत असे सांगितले. त्यावर मखरे यांनी रसाळ यांना तुला ठराविक माणसेच दिसतात का मी दत्तवाडीतच राहातो. असे म्हणून त्यांना शिवीगाळ करून आरडाओरडा करत शिक्षक रसाळ यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच अध्यापनाच्या कामात अडथळा केला कार्यालयातील कागदपत्रे भिरकावून दिली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिक्षक सुभाष रसाळ यांनी काल (दि ९ रोजी) रात्री संतोष ऊर्फ बाल्या दिलीप मखरे (रा.दत्तवाडी) यांच्याविरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीगोंदा पोलिसांनी संतोष ऊर्फ बाल्या मखरे याला रात्रीच अटक केली. आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.