कोणी निष्ठा शिकू नये, मी निष्ठावंत शिवसैनिक - निलेश लंके

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आपण अण्णांच्या तालुक्‍यात रहातो. अण्णा सर्वांना आपल्या कुटुंबाचा एक भाग मानतात. त्याप्रमाणे हे सर्व माझे कुटूंबच आहे. उपस्थित सर्व माझे कुटूंबच आहे. हे सर्व कार्यकर्ते नसून माझे मोठे भाऊ, बहिण, आई, वडिल आहेत. मी निष्ठावंत शिवसैनिक आहे, मला कोणी निष्ठा शिकवण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन पारनेर तालुक्‍याचे नेते निलेश लंके यांनी केले. हंगा (ता.पारनेर) येथे शनिवारी निलेश लंके यांच्या अभीष्टचिंतनानिमित्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने लंके समर्थकांची गर्दी होती. यावेळी ते बोलत होते.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले, अनिल कराळे, जि. प. सदस्य राजू जगदाळे (पुणे), शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते, शिवव्याख्याते गणेश शिंदे, माजी सभापती सुदाम पवार, नगर पंचायत समिती सभापती रामदास भोर, उल्हासनगर भाजप जिल्हा उपाध्यक्ष देवराम ठुबे, युवा सेना तालुका प्रमुख तथा वनकुटेचे सरपंच राहुल झावरे, ऍड. पांडुरंग गायकवाड, शिवसेना उप जिल्हाप्रमुख रामदास गोल्हार, मुंबई माजी नगरसेवक कोंडिभाऊ तिकोणे, बाबासाहेब तरटे, संजय मते, वाघुंड्याचे सरपंच संदिप मगर, शिवसेना उप तालुकाप्रमुख दादा शिंदे, भोयरे गांगर्डाचे उपसरपंच दौलतराव गांगड, पाडळी रांजणगावचे माजी सरपंच विक्रमसिंह कळमकर, मुंबईचे पप्पू जासूद, समर्थ पॉलिटेक्‍निकचे कैलास गाडीलकर, तालुक्‍यातील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, शिवसेना शाखा प्रमुख,युवा सेना प्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.

आमदार विजय औटी यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे पारनेर येथे आले असता सभा सुरू झाल्यानंतर तत्कालीन तालुकाप्रमुख निलेश लंके आपल्या समर्थकांसह कार्यक्रमस्थळी उशिरा आले. ते कार्यकर्त्याच्या खांद्यावर बसून आले. त्यावेळी उद्वव ठाकरे यांचे भाषण चालू होते. यावेळी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सभा संपल्यानंतर दगडफेक झाली. त्यात आ. औटी यांच्या गाडीची काच फुटली. या प्रकाराची दखल घेत पक्षप्रमुखांनी लंके यांची तालुकाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली. तेव्हापासून तालुक्‍याच्या राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. तेव्हापासून लंके समर्थकांनी वाढदिवसानिमित्त मोठे शिक्तीप्रदर्शन करायचे ठरवले होते. त्यानुसार हंगा येथे स्वयंस्फूर्तीने तरुण कार्यकर्ते व सर्व पक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या प्रकारामुळे निलेश लंके वाढदिवसानिमित्त नेमकी काय भूमिका जाहीर करतात, याकडे तालुक्‍याचे लक्ष लागले होते. यावेळी लंके यांनी आ. औटींचे नाव न घेता टीका केली. लंके म्हणाले, तालुक्‍यात बरेचजण कार्यक्रम घेतात व स्टेजवर फक्‍त कुटूंबच असते. मला बाळासाहेबांनी सांगितले 80 टक्‍के समाजकारण व 20 टक्‍के राजकारण कर कधीच कमी पडणार नाही. याप्रमाणे मी 24 तास जनतेची सेवा करत आहे. मला आजही घर नाही, पाऊस आला तर माझे घर गळते, तुम्हीच माझे कुटूंब आहात. त्यामुळे मला कुठलीच गोष्ट अशक्‍य वाटत नाही. 

तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित राहताल हे स्वप्नातही वाटले नव्हते. मित्रांनो “ये तो ट्रेलर है पिक्‍चर अभी बाकी है’, असे म्हणत लंके यांनी तालुक्‍यातील नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. मी आजही शिवसेनेचाच आहे, मला कुठल्याही प्रकारचा निरोप आला नाही. जनतेला विचारूनच पुढचा निणर्य घेईल, असे ते शेवटी म्हणाले.
यावेळी महिला, तालुक्‍यातील सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, सेवा सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.