मोबाईल लोकशनवरुन तरुणाचा मृतदेह सापडला

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर शहरातील नगर रोडवर असणाऱ्या दिपक भिमजी पटेल (वय ३०) या तरुणाचा मृतदेह मोबाईल लोकेशनवरुन नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या चंदनापुरी घाटात सापडला असल्याची घटना शनिवार दि. १० मार्च रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या पुर्वी घडली आहे. गेल्या पाच दिवसांपुर्वी दिपक हे घरातून निघून गेले होते. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिपक पटेल हे आपल्या कुटुंबासोबत नगर रोडवरील पंचायत समितीसमोर राहत होते. मंगळवार दि. ६ मार्च रोजी पटेल हे घरात कोणाला काही न सांगता घरातून निघून गेले होते. त्यानंतर घरच्यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंदही दाखल केली होती. सगळीकडे शोध घेत असताना शनिवार दि. १० मार्च रोजी मोबाईल लोकेशनवरुन त्यांचा मृतदेह नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या चंदनापुरी घाटातील निसर्ग परिचय केंद्राच्या एका वीस ते तीस फूट दरीमध्ये असल्याचे समजले. 

याबाबत तालुका पोलिसांना माहिती समजताच पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एम.बी.खान यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी काही नागरिकांच्या मदतीने दिपक यांचा मृतदेह दरीतून वर काढला. यावेळी दिपक यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे चंदनापुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी देशमुख यांना बोलवण्यात आले होते. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्यांनी घटनास्थळी येऊन दिपकच्या मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन केले. याप्रकरणी विनोद प्रमोद पटेल (रा.नविन नगर रोड) यांनी दिलेल्या खबरीवरुन तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.बी.खान हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.