श्रीरामपुरात कोंम्बिंग ऑपरेशन, 10 दरोडेखोर अटकेत

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पोलिसांनी शनिवारी रात्री 11 वाजता अचानक केलेल्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये 10 दरोडेखोरांसह 28 जणांना अटक करण्यात आली. 15 जणांवरप्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. कारवाईसाठी अप्पर पोलीस अधीक्षक, दोन उपाधीक्षकांसह 14 अधिकारी, दंगा नियंत्रण पथकासह 104 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे, संगमनेरचे उपाधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात रात्री 11 वाजता मुख्यालय, श्रीरामपूर व राहुरीच्या पोलिसांच्या पथकाने कोंबिंग ऑपरेशनला सुरवात केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
शहर व तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अजामीनपात्र गुन्ह्यातील 78 जणांच्या तपासणीदरम्यान दहाजणांना अटक करण्यात आली. त्यात सचिन उर्फलक्ष्मण कान्हू दारगोजी, सोमनाथ भाऊराव कुदळे, अक्षय उर्फसोनू बाबासाहेब पिंपळे, सागर सुरेश कांबळे, नंदकुमार रघुनाथ लोळगे, किरण सोपान सोनवणे, बापूसाहेब बाबासाहेब गोरे, भाऊसाहेब शंकर कांबळे, आनंदा पिंटू मोरे, सुगंध्या रतन काळे यांचा सामावेश आहे. तसेच जामीनपात्र गुन्ह्यातील 35 आरोपींची तपासणी केली असता तिघांना वॉरंट बजावण्यात आले. त्यानंतर हद्दीतील तडीपार असलेल्या सात जणांच्या पहाणीदरम्यान प्रकाश शिवाजी रणनवरे हा मिळून आला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.