समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय : आ.कोल्हे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ना. एकनाथ शिंदे यांनी नागपुर-मुंबई समृध्दी महामार्गाचे प्रश्न समजावुन घेवुन शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. त्यात आपल्या नावाचा शिमगा झाला पण विकासाची गुढी उभारली गेली याचे समाधान असल्‍याचे प्रतिपादन आ.स्‍नेहलता कोल्‍हे यांनी केले.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
रविवारी धामोरी रवंदे, येसगाव, खिर्डीगणेश प्रजिमा चार दहेगाव बोलका रस्त्याचे २ कोटी ६३ लाख रुपये खर्चाच्या मजबुतीकरण व सुधारणा कामाचे भुमिपुजन आ.कोल्हे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे, भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, संचालक फकिरराव बोरनारे, भास्करराव भिंगारे, पांडुरंगशास्त्री शिंदे, डॉ. गुलाबराव वरकड, निवृत्ती बनकर, प्रभाकर ससाणे, बाळासाहेब वक्ते, वैभव गिरमे, सोपानराव देशमुख, केशव भवर, उत्तमराव चरमळ, कैलास संवत्सरकर, वसंतराव देशमुख, विष्णुपंत क्षिरसागर आदी उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
आ. कोल्हे म्हणाल्या, विरोधकांकडे टिकेचा चष्मा आहे. सबुरीने घ्या सगळे प्रश्न सोडवुन दाखवू. साडेतीन वर्षात भाजपा-सेना युती शासनाकडुन कोपरगाव मतदार संघासाठी कोट्यावधीचा निधी आणून विकासकामे हाती घेतली आहेत. तालुक्यात लोकसहभागातुन जलयुक्त शिवाराची कामे मोठ्या प्रमाणात होण्यासाठी संजीवनीच्या माध्यमातुन पाझर तलावातील गाळ काढला. 

कार्यकर्त्यांनी आपल्याला विकास सुचवावा. चौदाव्या वित्त आयोगात तर आता ग्रामपंचायती सक्षम करून विकासाचा थेट निधी त्यांच्यापयंर्त दिला आहे. संजीवनी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष त्र्यंबकराव सरोदे यांनी प्रास्तविक केले. सहायक उपअभियंता संजय कोकणे यांनी रस्ते कामाची माहिती दिली. शेतकरी सहकारी संघाचे उपाध्यक्ष विलास कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. दहेगाव बोलका ग्रामपंचायतीच्या सरपंच संगिता सरोदे उपसरपंच रूक्मीणी आभाळे व पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्यावतीने आमदार कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे पौराहित्य किशोर व मनोज जोशी यांनी केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.