पुणतांब्यात भाजपची सत्ता संपुष्टात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पुणतांबे ग्रामपंचायत निवडणुकीत विखे गटाने वर्चस्व सिद्ध केल्याने तालुक्यात पुन्हा एकदा सबकुछ विखे, असे चित्र पाहावयास मिळाले. राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या पुणतांबे ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवत विखे गटाने भाजपची सत्ता काढून घेतली. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .

-------------------------------
मागील पंचवार्षिकमध्ये ही ग्रामपंचायत कोल्हे गटाकडे होती. कोल्हे व काळे गटाला पराभवाचा सामना करावा लागला. पुणतांबे ही मोठी ग्रामपंचायत समजली जाते. पुणतांबे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात येत असल्याने कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार अशोक काळे व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत येथे स्वतंत्र पॅनेल उभे केल्याने तिरंगी लढत झाली. 

सरपंचपदी विखे गटाचे डॉ. धनंजय धनवटे विजयी झाले. सदस्यांच्या १७ जागांपैकी ११ जागांवर विजय संपादन करत विखे गटाने भाजपची सत्ता काढून घेतली. डॉ. धनवटे यांना २७०८ मते मिळाली. त्यांनी कोल्हे गटाचे सुधाकर जाधव व काळे गटाचे मुरलीधर थोरात यांचा पराभव केला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सुहास वहाडणे यांनी काही ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते. त्यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली. सरपंचपदासाठी अपक्ष म्हणून चार उमेदवारांनी आपले भविष्य अजमावून पाहिले. कोल्हे गटाला चार जागा, तर काळे गटाला दोन जागा मिळाल्या. अपक्षाला खातेही उघडता आले नाही. आमदार कोल्हे व अशोक काळे यांच्या गटाला पराभवाचा मोठा धक्का बसला.


-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.