रस्त्यांची कामे न करता बोगस बीले काढणार्‍यांवर कारवाईस टाळाटाळ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नागरदेवळे ग्रामपंचायत मध्ये रस्त्यांची कामे न करताच पुर्णत्वाचा दाखला देऊन ठेकेदारास बीले अदा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे 15 लाखांच्या या गैरव्यवहाराबाबत पुराव्यासह तक्रार करून तीन महिने झाले, तरी कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याच्या निषेधार्थ ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे यांनी जिल्हा परिषद कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात महेश झोडगे यांनी म्हटले आहे की, नागर देवळे ग्रामपंचायत हद्दीतील श्रीराम कॉलनीमध्ये 25/15 योजनेअंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण (खर्च 10 लाख), अंतर्गत गटारीचे काम (खर्च 2 लाख 50 हजार) चा दोन्ही कामांचा पुर्णत्वाचा दाखला जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील उपअभियंता व विभागीय अभियंता यांच्या स्वाक्षरीने दि.1 सप्टेंबर 2017 रोजी देण्यात आलेला आहे. याशिवाय 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून मधुरा नगरी येथे 2 लाख 50 हजार खर्चुन रस्ता काँक्रीटीकरणाचे काम पुर्ण केल्याचा दाखला दि.10 ऑगस्ट 2017 रोजी देण्यात आलेला आहे. या पुर्णत्वाच्या दाखल्यांमुळे संबंधित कामांची बीलेही काढण्यात आलेली आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
प्रत्यक्षात मात्र पुर्णत्वाच्या दाखल्याच्या दिनांकापुर्वी आणि त्यानंतर आजपर्यंत प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारचे कामे सदर ठिकाणी झालेले नाही. त्यामुळे या कामांची बोगस बीले काढून संबंधित अधिकारी, ठेकेदार व त्यांच्या इतर साथीदारांनी गैरव्यवहार करत सरकारी निधीचा अपहार केलेला दिसून येत आहे. या गंभीर प्रकाराची कसून चौकशी करुन संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आपण दि.18 डिसेंबर 2017 रोजी केली होती.

त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकार्‍यांनी समक्ष पाहणी केली. नागरिकांचे जबाब घेतले, तरी काहीच कारवाई झाली नाही. पुन्हा आपण दि.3 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्याबाबत मागणी पत्र दिले होते. त्यास दोन महिने होत आले आहेत, तरीही कारवाईस टाळाटाळ होत आहे. याबाबत त्वरित कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य महेश झोडगे यांनी दिला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.