राष्ट्रवादीने फेज-२ साठी आंदोलन करून दाखवावे !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- फेज-२ ही योजना कोणाच्या सत्तेत बंद पडली आणि कोणाच्या सत्तेत चालू झाली हे नागरिकांना चांगले माहित आहे. महापालिकाच्या निवडणुका होत आहे त्यामुळे विरोधक नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी फेज-२ बाबत खोट्या अफवा पसरविल्या जात आहेत. हे अफवा पसरविणारे राष्ट्रवादीने फेज-२ चे काम लवकर मार्गी लावावीत यासाठी कधी आंदोलन केले आहे का, असा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रवादी कॉंग्रेसला याबाबत आंदोलन करण्याचे खुले आव्हान नगरसेवक योगीराज गाडे यांनी दिले आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
गाडे म्हणाले, 'महापालिकेत शिवसेनेची सत्ता येण्यापूर्वी फेज-२ च्या कामाला कायम विलंब होत गेला आहे. त्यामुळे फेज-२ च्या योजनेत भ्रष्टाचार संभवतोच. फेज-२ च्या योजनेत कोणी काय केले कसा भ्रष्टाचार झाला याच्या हिशोबाची जंत्री राष्ट्रवादीला चांगलीच माहित आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कधीच फेज-२ चे काम लवकर पूर्ण करा आणि नगरकरांनच्या पिण्याच्या पाणी प्रश्न सोडवा, असे म्हणत नाही, असा टोला गाडे यांनी लावला आहे.

चैतन्यनगर (प्रभाग ११) येथे फेज-२ पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन कामाची पाहणी नगरसेवक योगीराज गाडे यांनी केली. त्यानंतर त्यांनी हे प्रसिद्ध पत्रक काढले आहे. श्रीकृष्ण पिंगळे, अनिल नंदा, उमेश काळे, विशाल बांगर उपस्थित होते. नगर शहरात ८ वर्षापूर्वी ११६ कोटीची योजना फेज-२ पिण्याच्या पाणीची पाइपलाइनचे काम सुरू झाले आहे. त्यावेळी न लागणारे पाईप पण खरेदी करण्यात आले आणि त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप गाडे यांनी केला आहे.

मुळापासून नगर पर्यंतचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पण नगर शहरातील अंतर्गत ३५५ किलोमीटरचे काम रखडले होते. शिवसेनेची महापालिकेवर सत्ता आल्यापासून फेज-२ चे काम नगर शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे. कारण जनतेची तळतळ ही फक्त शिवसेनेलाच समजते. फेज-२ चे काम लवकर पूर्ण करण्यासाठी आयुक्तांनी जातीने लक्ष्य द्यावे, असे ही मत नगरसेवक योगीराज गाडे यांनी व्यक्त केले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.