अहमदनगर सीए शाखेचे अध्यक्षपदी सीए ज्ञानेश कुलकर्णी,उपाध्यक्षपदी सीए डॉ.परेश बोरा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहमदनगर सीए शाखेची बैठक मावळते अध्यक्ष सीए प्रसाद भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.या बैठकीत सन २०२८-१९ वर्षासाठी नूतन कार्यकारणीची बिनविरोध निवड करण्यात आली.
 
                                                
                                                   ----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अहमदनगर सीए शाखेचे नूतन अध्यक्षपदी सीए ज्ञानेश कुलकर्णी,उपाध्यक्षपदी सीए डॉ.परेश बोरा, सचिवपदी सीए किरण भंडारी,खजिनदारपदी सीए सनीत मुथा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच सीए विध्यार्थी शाखा ( डब्ल्यूआयआरसीएएसए )च्या अध्यक्षपदी सीए डॉ.परेश बोरा व कार्यकारी सदस्य पदी सीए सनीत मुथा यांची निवड करण्यात आली.यावेळी शाखेच्या व्यवस्थापकीय समितीचे ज्येष्ठ सदस्य,माजी अध्यक्ष सर्वश्री सीए सुशील जैन उपस्थित होते.

                                   
नूतन अध्यक्ष सीए ज्ञानेश कुलकर्णी यावेळी म्हणाले कि, अहमदनगर सीए शाखेची गौरवशाली परंपरा जोपासत ,सामाजिक उपक्रमा बरोबरच संस्थेचे हित निश्चित जोपासले जाईल.सर्वांच्या सहकार्याने नव्या विचारणा प्राधान्य देऊन नव्या ज्ञानाची ,तंत्रज्ञानाची कास धरून अधिक प्रभावी कार्य सीए साठी करण्यात येईल.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
नूतन कार्यकारणीच्या निवडी बद्दल माजी अध्यक्ष सीए मोहन बरमेचा,सीए विजय मर्दा,सीए संजय देशमुख ,सीए अजय मुथा, सीए मिलिंद जांगडा यांनी व सीए शाखेशी निगडीत शहरातील विविध क्षेत्रातिल मान्यवरांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे आभिनंदन केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.