भगवानगडावर येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद देण्यासाठी 11 लाख रुपये लोकवर्गणी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीक्षेत्र भगवानगडावर येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद देण्यासाठी धान्य रूपाने मदत करण्याची परंपरा ढाकणेवस्ती येथील रहिवाशांनी 51 व्या वर्षीसुद्धा टिकवली. 50 क्विंटल वार्षिक धान्याबरोबरच यंदा 11 लाख रुपये लोकवर्गणी देण्यात आली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
ढाकणेवस्तीची लोकसंख्या अवघी साडेतीनशेच्या आसपास आहे. भगवानगड परिसरातील लाडजळगाव जवळील ढाकणेवस्ती म्हणजे अवघ्या 40 घरांची वस्ती. भगवानगडाच्या स्थापनेपासून येथील भाविकांची भावनिक नाळ या गडाशी जोडली गेली.

वै. भगवान बाबांच्या सांप्रदायिक संस्कारातून संपूर्ण वस्ती वारकरी सांप्रदायाची उपासना करते. अहोरात्र महाप्रसाद वाटपासाठी गडाचे महंत डॉ.नामदेव शास्त्री यांनी आधुनिक पद्धतीने महाप्रसादगृह उभारले.

गावोगावच्या भाविकांच्या योगदानातून नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वाधिक भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. वै. भगवान बाबांनी असा उपक्रम सुरू करण्याची संकल्पना जाहीर केली होती. ढाकणे वस्तीच्या भाविकांनी गडाला दरवर्षी 50 क्विंटल धान्य देण्याचा निर्णय जाहीर करत बाबांच्या हस्ते प्रसादाचा नारळ स्वीकारला. कितीही दुष्काळी परिस्थिती असली तरी गेल्या 50 वर्षांत गडाला दरवर्षी 50 क्विंटल धान्य देण्याच्या उपक्रमात खंड पडू दिलेला नाही.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्यामार्फत सुरू असलेला गडाचा सर्वांगीण विकास, दिवसेंदिवस वाढत चाललेली वर्दळ पाहून उर्वरित विकास कामासाठी रोख रक्कम देणगी स्वरूपात देण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला.यासाठी महंतांना वस्तीवर निमंत्रित केले. गडाचे महंत छोट्याशा वस्तीवर आले म्हणून ग्रामस्थांनी दिवाळी सणासारखा आनंद व्यक्‍त केला. भगवानबाबांचा जयघोष करत 11 लाख रुपये महंतांकडे सुपूर्द केले.

डॉ. नामदेव शास्त्री म्हणाले, भगवानगडाला आजपर्यंत गोरगरीब, कष्टकरी लोकांनी मोलाची मदत केली. ज्यांना गड, गादी व बाबांचे महत्त्व कळाले नाही त्यांनी गडाला नावे ठेवत स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. अध्यात्मिक शक्‍तींचे मोठे ऊर्जास्थान म्हणून गडाकडे पाहिले जाते. सर्वसामान्य माणूस वयाचा रौप्य महोत्सव, रजत महोत्सव, सुवर्ण महोत्सव, सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा असे कार्यक्रम वाजतगाजत करतो. दानधर्म करण्याचा रजत महोत्सव (51 वर्षे) पूर्ण करणारे ढाकणे वस्तीसारखे गाव जिल्ह्यात एकमेव ठरले आहे.

धनाढ्य व संपन्न वर्गाला दानधर्म करण्याऐवजी मौजमजा करावी वाटते, तर कष्टकरी माणूस पोटाला चिमटे घेत मौजमजा बाजूला ठेवत दुसऱ्याच्या भुकेची काळजी करत दानधर्म अत्यंत श्रद्धेने करतो हा खरा श्रेष्ठ धर्म आहे. गेल्या दोन वर्षांत गडाच्या महाप्रसादगृहात भाविकांची गर्दी वाढत आहे. राज्याच्या विविध भागासह परराज्यांतूनही भाविक एकादशीला गडावर येतात.

अनेक गावांकडून महाप्रसाद सेवा दैनंदिन सुरुवात करण्याची तयारी आहे. ग्रामस्थांचा सेवाभाव पाहून योग्यवेळी निर्णय घेऊ. गुरुपरंपरा वारकरी संप्रदायाचा मुख्य प्रवाह आहे. गडाच्या गादीला गुरुस्थानी मानून लाखो भाविक गुरुपौर्णिमेला गडावर येतात. ढाकणे वस्तीच्या ग्रामस्थांचा आदर्श सर्वच भाविकांनी घेण्यासारखा आहे, असे शास्त्री म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.