अखेर अण्णांच्या आंदोलनाला परवानगी मिळाली !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील २३ मार्च रोजीच्या नियोजित आंदोलनास केंद्रीय गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिस यांनी अखेर परवानगी दिली. रामलीला मैदानावर आंदोलन करण्यास हरकत नसल्याचे हजारे यांना कळविण्यात आले आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
आता जागेच्या परवानगीसाठी दिल्ली महानगरपालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. दरम्यान, प्रबोधनासाठी ८ मार्चपर्यंत हजारे यांच्या सभा सुरूच राहणार असून, ७ मार्चला जम्मूमध्ये सभा होणार आहे. लोकपाल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यांवर हजारे यांनी आंदोलन पुकारले आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
काही महिन्यांपूर्वीच तारीख जाहीर करण्यात आली होती. परवागनीसाठी रितसर अर्जही केले होते. मात्र, त्यावर निर्णय होत नव्हता. अखेर गेल्या आठवड्यात या प्रक्रियेला वेग आला. आता गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिस यांनी आंदोलनासाठी लेखी परवानगी दिली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.