नीलेश लंके यांनी मागितली उद्धव ठाकरे यांची माफी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंगळवारी पारनेरच्या शेतकरी मेळाव्यात जो प्रकार झाला, तो निंदनीय व चुकीचा आहे. शिवसेनेत पक्षशिस्तीला फार महत्त्व असून तालुकाप्रमुख या नात्याने ठाकरे यांच्या भाषणाअगोदर कार्यक्रमस्थळी येणे गरजेचे होते. येण्यास उशीर झाल्याबद्दल ठाकरे यांची माफी मागतो, असे तालुकाप्रमुख नीलेश लंके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे आमचे दैवत अाहेत, असे नमूद करून लंके म्हणाले, शिवसेना नेते व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर काढलेल्या रॅलीमुळे मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचायला उशीर झाला. त्याबद्दल मी दिलगीर आहे. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून पारनेर तालुक्यासह जिल्ह्यात निष्ठावान शिवसैनिक म्हणून मी काम करत आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सच्चा शिवसैनिक म्हणून शिवसेना पक्षवाढीसाठी मी भविष्यात प्रयत्न करणार असल्याचे लंके यांनी सांगितले. मंगळवारच्या कार्यक्रमात जो प्रकार झाला, त्याबाबत शिवसेना उपनेते व माजी आमदार अनिल राठोड व जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी प्रसारमाध्यमांकडे खुलासा केला आहे, असेही लंके यांनी स्पष्ट केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.