बाजारला जाते असे सांगून विवाहिता लहान मुलीसह बेपत्ता.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथून चिमुकल्या मुलीसह एक विवाहिता बेपत्ता झाली आहे. सौ. भारती दत्तात्रय दिघे (वय २५) व अनुष्का दत्तात्रय दिघे (वय ४) असे बेपत्ता मायलेकींचे नाव आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या मिसिंग रजिस्टरला नोंद करण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे गुरुवारी आठवडे बाजार होता. भारती दत्तात्रय दिघे ही विवाहिता दुपारी साडेतीन वाजता बाजारला जाते असे सांगून मुलगी अनुष्का हिला सोबत घेवून घराबाहेर पडली. त्यांनंतर ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी शोध घेवूनही ती सापडली नाही.पती दत्तात्रय तुळशीराम दिघे यांनी तशा आशयाची खबर पोलिसांत दिली.

रंगाने सावळी, शरीराने सडपातळ, उंची पाच फुट, चेहरा उभट, जांभळ्या रंगाची साडी परिधान केलेली असे बेपत्ता विवाहितेचे वर्णन आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या मिसिंग रजिस्टरला मायलेकी बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. लक्ष्मण औटी अधिक तपास करीत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.