अल्पवयनीन मुलीचा विनयभंग; आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश . ए.बी. भिल्लारे यांनी आरोपी ज्ञानदेव नंदू चव्हाण (रा.स्वस्तिक चौक, अ. नगर) याला दोषी धरून तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड.मोहन कुलकर्णी यांनी काम पाहिले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या खटल्याची माहिती अशी की, दि. ६/१०/२०१५ रोजी संध्याकाळी ५.४० वा. सुमारास आरोपी ज्ञानदेव नंदू चव्हाण, अक्षय शहादेव साळवे व इतर दोन अनोळखी इसम हे हिरोहोंडा मोटारसायकलवर येऊन अल्पवयीन मुलगी (वय १४) ही शाळेत जात असताना तिचा छुपा पाठलाग करून. आरोपी चव्हाण याने तिच्याशी ओळख वाढविण्याच्या हेतूने तिची इच्छा नसताना बोलण्याचा प्रयत्न केला. व तिला चहा घेण्यासाठी चल, मला तुझ्याशी बोलायचे आहे. व एक चिठ्ठी द्यायची आहे. असे म्हणून तिचा हात पकडून, ओढून गाडीवर बसण्यास सांगून. लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. 

याबाबत संबंधित आरोपीविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोसई जे. एन. काळे यांनी करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सदर खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. ए. बी. भिल्लारे यांचेसमोर चालला यामध्ये सरकारपक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, फिर्यादीचा भाऊ, तपासी अंमलदार यांची साक्ष व सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी ज्ञानदेव चव्हाण याला भादंवि का. कलम ३५४ अ / ड नुसार पत्येकी ३ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड. दंड न भरल्यास प्रत्येकी दोन महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.