शिर्डी बायपास रस्त्यावर विद्यार्थ्यास ट्रकने उडविले

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नव्याने झालेल्या बायपास रोडवर भरधाव ट्रकने शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्यास जोराची धडक दिली. नववीच्या वर्गात शिकण घेत असलेला सुरज नवनाथ वाणी हा विद्यार्थी मृत्युमुखी पडला. यानंतर ही ट्रक पलटी झाला.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
कोऱ्हाळे येथून शाळा सुटल्यानंतर नांदुर्खीकडे आपल्या घरी नव्याने तयार झालेल्या बायपास रोडने सुरज नवनाथ वाणी (वय 13), रा.नांदुर्खी हा सायकलवर जात होता. याचवेळी निमगावकडून कोऱ्हाळेकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने विद्यार्थ्यास जोराची धडक दिली. यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्यास नागरिकांनी साईबाबा रुग्णालयात दाखल केले मात्र या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.

याबाबत शिर्डी पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अत्यंत गुणी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नांदुर्खी गावात व शाळेत शोककळा पसरली आहे. नवीन बायपास झालेल्या मार्गावरून जाणाऱ्या मालट्रक मोठ्या वेगाने जात असल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे. या बायपासला डोऱ्हाळे, कोऱ्हाळे, निमगाव जोडणारा मार्ग आहे. तसेच याच रस्त्याच्याकडेला तीन ते चार विद्यालय आहेत. तसेच लोणी ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.