राहुरीत बहीण-भावाच्या नात्याला काळिमा !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्यातील केसापूर येथे बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार समोर आला आहे. येथील एका १५ वर्षीय मुलीवर तिच्या भावासह मामाच्या तीन मुलांनी अत्याचार केला. यात मुलगी गरोदर राहिल्याने मुलीने राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले, की भावाने सन २०११ ते २०१५ या दरम्यान संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथे वेळोवेळी अत्याचार केला. तसेच २०१५ ते २२ फेब्रुवारी २०१८ यादरम्यान मामाच्या तीन मुलांनी वेळोवेळी, वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तसेच मामीच्या घरात अत्याचार केला. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तीला एका खासगी रुग्णालयात देण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तीची सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. मुलीने तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत आपल्या आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला.यानंतर त्यांनी मुलीला घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तीन आरोपींना पोलिसांनी गजाआड केले असून एक पसार झाला आहे. 
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.