महाराष्ट्रतील सर्वात जास्त ग्रॅन्डमास्टर नगरमधील बुद्धिबळ खेळाडू असतील - नरेंद्र फिरोदिया

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्यात आज नगर बुद्धिबळ खेळासाठी सुप्रसिद्ध आहेच,अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना व मॅक्सीमस स्पोर्ट यांनी भविष्यातील गरज ओळखून मॅक्सीमस चेसकट्टा हा अभिनव उपक्रम सुरु केला असून त्याचा फायदा जिल्ह्यातील सर्व बुद्धिबळ प्रेमीना होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रतील सर्वात जास्त ग्रॅन्डमास्टर नगरमधील बुद्धिबळ खेळाडू असतील हा या उपक्रमाचा उददेश निश्चित पूर्ण होईल असा विश्वास श्री.नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केला.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
वाडीयापार्क ,बॅडमिंटन हॉल येथे ग्रॅन्डमास्टर शार्दुल गागरेच्या हस्ते मॅक्सीमस चेसकट्टाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी फिरोदिया बोलत होते,याप्रसंगी जिल्हाक्रीडाधिकारी श्री.उदय जोशी,दादासाहेब देवकाते, बुद्धिबळ संघटनेचे नरेंद्र कुलकर्णी,यशवंत बापट,आपासाहेब ढूस व मान्यवर उपस्थित होते.

शार्दुल गागरे यांनी सांगितले कि,श्री.शांतीकुमार फिरोदिया ट्रस्ट सहकार्यामुळेच मी ग्रॅन्डमास्टर होऊ शकलो.चांगल्या व गुणवंत खेळाडूना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ट्रस्टने नेहमीच बळ दिले असून समाजासाठी त्यांचे हे कार्य आदर्शवत आहे.

जिल्हाक्रीडाधिकारी श्री.उदय जीशी म्हणाले कि,प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याने एकातरी मैदानी खेळत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.कारण आज बौद्धिक विकासा बरोबरीने शाररीक विकास होण्याची गरज वाढत आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यावेळी राज्यशासनाचा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त ग्रॅन्डमास्टर शार्दुल गागरे व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक अहमदनगर बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी केले. मॅक्सीमस चेसकट्टा सुरु करण्यासाठी संदीप जोशी व पल्लवी सेंदाने यांनी विशेष परिश्रम घेतले.या ठिकाणी लहाना पासून ते वृद्धापर्यंत सर्वांना बुद्धिबळ खेळण्याचा व शिकण्याचा आनंद घेता येईल .

या ठिकाणी असलेल्या आंतरराष्ट्रीय पुस्तकांचाही लाभ घेता येणार असून वायफाय सुविधाही उपलब्ध असणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पारुनाथ ठोकळ यांनी केले.कार्यक्रमास सुबोध ठोंबरे,डॉ.अण्णासाहेब गागरे,डॉ.स्मिता वाघ,दक्ष कुलकर्णी,शामली गागरे,दता घाडगे व बुद्धिबळ खेळाडू,प्रेमी उपस्थित होते.आभार शाम कांबळे यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.