पारनेरमध्ये निलेश लंके यांच्या वाढदिवसाचा फलक फाडला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर शहरात शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेला फलक अज्ञात इसमांनी रात्री फाडला. आज निलेश लंके यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे समर्थकांनी पारनेरमध्ये लावलेला फलक फाडल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र काही वेळाने या प्रकरणावर पडदा पडला. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
हा फलक शहरातील लंके समर्थक नगरसेवक नंदकुमार औटी यांचे बंधू विजय औटी यांनी हा फलक लावला होता. फलक फाडणार्या अशा प्रवृत्तींचा निषेध लंके समर्थक औटी यांनी केला. आमदार पुत्र अनिकेत औटी व निलेश लंके यांच्यात काही दिवसांपासुन संघर्ष सुरू आहे. यातुनच हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. 
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.