देशद्रोही श्रीपाद छिंदम यास खुले पत्र

पत्र लिहिण्याचं कारण असं की आमच्या पूर्वजांनी तलवारी चालवून क्रांती केली पण लोकशाही प्रधान देशातील संविधानावर प्रेम करणाऱ्या माणसांनी लेखणी चालवून क्रांती केलेली आहे याही आमच्याच इतिहासावर आमचा विश्वास आहे.म्हणून ही लेखणी.आमचा महाराष्ट्र दगडगोट्यांचा आहे इथल्या मातीवर प्रेम करणाऱ्या मावळ्यांनी तुझ्यावर तुझ्या घरावर दगडं भिरकावली पण तुझ्यासारखा नीचपणा आणखी कुणी करू नये यासाठी केवळ जखमा देऊन किंवा मृत्युदंड देऊन भागणार नाही.तू जे बोललास ती प्रवृत्ती बोलली.ती समूळ नष्ट करण्यासाठी तुला कितीही मोठी शिक्षा केली तरी कमीच आहे..


छत्रपती शिवराय यांचं नुसतं नामस्मरण केलं तरी आमची छाती मूठभर उंच होते.शिवराय आमचे मानबिंदू, आमचे स्वाभिमान आहेत..शिवराय या देशाची अस्मिता आहे..त्याच अस्मितेबद्दल तू गल्लीतल्या शिव्या द्याव्यास आणि भडस बाहेर काढावी अशी मळमळीत गरळ ओकलास. असो ज्याच्या त्याच्या संस्काराचा हा भाग आहे . कुठल्याच आईला वाटत नसेल तुझ्याइतका असंस्कारी मुलगा जन्माला घालावा.तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द खूप महत्त्वाचा असतो.शब्द जपून वापरावेत यावर तुझा विश्वास नाही हे न पटण्यासारखे आहे कारण राजकारणात येऊन मोठं व्हायचं तर हे इथिक्स माहिती करून घ्यावे लागतात.

छत्रपती शिवरायांबद्दल तुला इतका द्वेष का? हा प्रश्न।महाराष्ट्रातल्या हजारो मित्रांनी मला विचारला तर याचं उत्तर तुझ्या वागण्या बोलण्यात आणि आतापर्यंत केलेल्या करणीत आहे.शिवरायांनी गोरगरीब जनतेला त्रास देणाऱ्या, शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या , आया बहिणींची इज्जत लुटणाऱ्यांना टकमक टोक दाखवलं , जबरी शिक्षा दिल्या.
चूक करेल तो या स्वराज्यात राहणार नाही ही शिवरायांची शिकवण मात्र तू अगदी याऊलट वागलास.
2015 साली विनयभंगाचा गुन्हा, अनेक गरिबांना त्रास, पैसा आला मुजोरी वाढली ,दहशत वाढली आणि एकप्रकारचा मोगलसम्राटाच्या थाटात तू वागू लागलास आणि यातच आम्हाला तुझ्या शिवराय द्वेषाचं कारण दिसतं..

शिवरायांनी दिलेले विचार पावलो पावलो पायदळी तुडवायचेत आणि हे काय आम्हाला सारखं सारखं शिवविचार सांगतात अशी तुझ्या मनाची झालेली अवस्था.धार्मिक कट्टरता बाळगणाऱ्या चमू मध्ये सामील झाल्यावर शिवराय तर अजून तुला अप्रिय झाले आणि ही मळमळ बाहेर पडली..पदाधिकारी झालास म्हणून इमाने चाकरी करणाऱ्या कर्मचारी यांना मोगलाई च्या काळात घेऊन जात तशा प्रकारचे काम करून घ्यायला लागलास.. ते तुझे बटीक नाहीत, शासनाचे चाकर आहेत हे तू विसरलास...

ज्यांनी ज्यांनी तुझं ते फोनवरचं संभाषण ऐकलं त्या-त्या मराठी माणसाला , शिवरायांना अस्मिता मानणाऱ्या सगळ्या जाती धर्मातील माणसांना प्रचंड संताप आला, तळपायाची आग मस्तकात गेली..आणि भरचौकात तुझ्यावर सामूहिक हल्ला करावा, पायातली चप्पल काढुन कानशिलात मारावी, याच्याही पेक्षा भयानक शिक्षेच्या कल्पना त्यांच्या मनात आल्या.

केलेली चूक तुझ्या लक्षात आली.आणि मग नाक घासून माफी मागतो वगैरे वगैरे गप्पा मारल्यास..
लहानपणी आपल्या बापाचा जर कुणी अपमान केला असेल ना तर मोठं झाल्यावरही तो अपमान विस्मरणात जात नाही बदले की आग उफाळून येते आणि शिवरायांसारख्या अखंड जगासमोर आदर्श ठेवणाऱ्या राजांबद्दल त्यांची जयंती जवळ आली असताना तू केलेला माज ,दाखवलेला नीचपणा आम्ही मराठी माणसे माफी मागितल्यावर विसरू हे कसं शक्यय??

महाराष्ट्र पेटला, सोशल मीडिया पेटला, तुझं कार्यालय, घर ,गाड्या संतप्त शिवप्रेमींनी फोडल्या.. हा तुझ्याबद्दल चा राग नाहीय तर हे शिवरायांबद्दलची आस्था, प्रेम आणि जिव्हाळा आहे.
जन्मदात्या आई-बाळांपेक्षा ही शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर या अस्मितांवर प्रेम करणारे आम्ही आणि त्यांच्यावर, त्यांच्या विचारांची पायमल्ली करत त्यावर सातत्याने घाला घालणारे तुझ्यासारखे सडक्या मेंदूचे कार्यकर्ते समाज नासवत आहेत..

ही कीड सगळीकडे पसरू नये याची आम्हाला काळजी घ्यावी लागेल..
तुझा माज सत्तेचा पैशाचा रुबाब दाखवणारे आणि आयाबहिणींची अब्रू लुटणारे, मुजोरीत वागणारे, सर्वसामान्य माणसाला त्रासदायक ठरणाऱ्या दहशतवादी प्रवृत्ती आम्ही वेळीच ठेचून काढल्या असत्या तर शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या औलादी इथं जन्मल्याच नसत्या..
आम्हीच चुकलो ओळखायला, निरखायला, पारखायला..

आता ऐक सबजेल, कोठडी, कारागृह यापैकी कशातच न अडकता सत्तेचा वापर करून सुटलास जरी तरी जाज्वल्य इतिहास लाभलेल्या अहमदनगर शहरात तू सन्मानाने जगू आणि राहूच शकत नाहीस हे मी आज ठामपणे सांगतो..उठल्या बसल्या शिवप्रेमींच्या शिव्यांना, चपलेच्या,काठीच्या ठोक्याला बळी पडशील. माफी मागून काही होत नसत..

तुला महाराष्ट्राची मावळ माती सोडावी लागणार आहे हे यानिमित्ताने सांगतोय.
कायद्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे..
धीराने घेऊ पण घेऊ..

शिवरायांना वंदन करून, चरणी नतमस्तक होऊन एक शपथ घेतो जरी तू नगरमध्ये राहिलास तरी तुझं ज्या कार्यक्रमात, पत्रिकेत नाव असेल , जिथं तू येणार असशील तो कार्यक्रम मी करणार नाही..कारण मी कलाकार आहे सच्चा कलाकार ,शिवरायांच्या विचारांवर श्रद्धा असलेला सामान्य मराठी कलाकार...तुला देशद्रोही म्हटलो कारण देशाच्या अस्मिता असणाऱ्या राजांबद्दल तू खालच्या पातळीवर जाऊन बोललास , तू देशद्रोहीच आहेस....
चल पेन ठेवतो आणि टकमक टोकाकड एक चक्कर मारून येतो..
                                                                                                                                                               
                                                                                                      

उद्धव काळापहाड अहमदनगर...!

निवेदक, सूत्रसंचालक, पत्रकार
9393895050...
Powered by Blogger.