नगर जिल्ह्यातील चारा घोटाळा 200 कोटीच्या पेक्षा जास्त मोठा !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्ह्यातील 2012 ते 2014 मधील चारा घोटाळा 200 कोटीच्या पुढे असून, त्यामध्ये बोगस पशुधन दाखविणे, लेखा परिक्षण अहवालात अनेक कोट्यवधी रूपयांचा खुलासा करण्यात आला नाही. बोगस चारा छावण्या दाखविण्यात आल्या आहे. शासन अधिनियमानुसार प्रति किलो चारा दर न दाखवता लहान व मोठ्या जनावरांचा खूप मोठ्या प्रमाणात दर दाखविण्यात आले असून, यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत असल्याची तक्रार काका पाटील गायके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शासनाला वेळोवेळी कागदपत्राच्या पुराव्यासहीत दिलेले असून, शासनाने या कागदपत्राच्या आधारे कारवाई केलेली नाही. चारा छावण्यावरील 188 कलमांतर्गत जी कारवाई झालेली आहे. ती कारवाई कोणत्याही कागदपत्राच्या वस्तुस्थितीला धरून नाही. 2012 ते 2014 मधील चारा घोटाळ्यामध्ये जिल्ह्यातील महसूलचे अधिकारी, कर्मचारी व सर्व चारा छावण्या चालक संस्था आहेत. चारा छावण्या व चारा डेपो 11 तालुक्‍यामध्ये कार्यरत होत्या.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

जिल्ह्याची पशुधन संख्या फक्त 13 लाखाच्या आसपास असून पाथर्डी सारख्या तालुक्‍यामध्ये 74 लाखाच्या पुढे दाखविण्यात आली आहे. 11 तालुक्‍यातील पशुधन जास्तीत-जास्त 7 ते 8 लाख असू शकते. म्हणून सर्व रकमा सर्व अधिकारी व कर्मचारी व चारा छावण्या चालक यांच्याकडून वसूल करण्यात यावी व शासनास जमा करण्यात यावी. तसेच सर्वांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे, अन्यथा न्यायालयात कागदपत्राच्या आधारे दाद मागण्याची वेळ येऊ नये, असे गायके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.