डॉ. अनिल पाटील यांना धन्वंतरी भूषण पुरस्कार प्रदान .

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर येथील सिद्धकला आयुर्वेद महाविद्यालया तर्फे दिला जाणारा धन्वंतरी भूषण पुरस्कार वेदीक्युअर वेलनेस क्लिनिक्स अँड हॉस्पिटल आणि रॅशनल सायंटिफिक अँड स्पिरिच्युअल फोरम चे संस्थापक डॉ. अनिल पाटील यांना प्रदान करण्यात आला. 


महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थी आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या डॉ. किशोर सराफ यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. पाटील यांना देण्यात आला. अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू असलेला आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार तसेच आयुर्वेद क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना गौरवण्यात आले. 

कार्यक्रमाला स्पेनच्या क्लॉडिन पिनेट व डॉ. पंडित सावंत (मुंबई ) यांची विशेष उपस्थिती होती. या वेळी “आयुर्वेद आणि अध्यात्म” या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. परिषदेमध्ये डॉ. पाटील यांनी आयुर्वेद आणि विश्वाची निर्मिती म्हणजेच अध्यात्म जो सर्व विज्ञानाचा पाया असून ज्याचा शोध भारतीय ऋषीमुनींनी लावला असल्याचा अत्यंत गहन आणि प्रत्यय असलेला सम्बंध समजावून सांगितला. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. प्रशांत शास्त्री यांनी केले होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.