नव्या जिल्ह्यासाठी संगमनेरच योग्य - आमदार बाळासाहेब थोरात

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : पालकमंत्री आणि महसूलमंत्र्यांनी जिल्हा विभाजनाबाबत सुतोवाच केल्यानंतर नगर जिल्हा विभाजनाचा वाद पेटला आहे. नव्या जिल्ह्यासाठी संगमनेरच योग्य असल्याचे सांगत यावर कृती समितीच्या माध्यमातुन जनआंदोलन उभे करण्याचा निर्णय झाला असतांनाच आता आमदार बाळासाहेब थोरात यांनीदेखील आपली भुमिका स्पष्ट करत जिल्हा विभाजनासाठी मुख्यमंत्र्यांनी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. अापण संगमनेरसाठी अनुकूल असल्याचे त्यांनी सांगितले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
जिल्हा विभाजनासाठी उत्तरेतून जोरदार हालचाली सुरु झाल्यानंतर संगमनेरात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्रित कृती समितीची स्थापना केली. समितीच्या बैठकीत संगमनेर तालुक्याशी संबधीत चारही आमदारांची भुमिका काय आहे हे जाणुन घेण्यासाठी आणि त्यांचा सहभाग मिळण्यासाठी त्यांची भेट घेण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत झाला होता. या पार्श्वभुमीवर कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आमदार थोरात यांची मंगळवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, राजेश चौधरी, शौकत जहागिरदार, प्रशांत वामन, अशोक सातपुते, अजय फटांगरे, बाळासाहेब पवार, लक्ष्मीकांत दसरे, संजय नाकील, विश्वास मुर्तडक, अमोल खताळ, नरेश माळवे, कपिल पवार, सोमेश्वर दिवटे, अजित काकडे, शैलेश कलंत्री, किरण घोटेकर, प्रकाश कलंत्री, नितीन अभंग, राजाभाऊ देशमुख, अरविंद वैद्य उपस्थित होते. 

थोरात म्हणाले, प्रशासकीय आणि जनतेच्या सोयीसाठी जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजेत. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळते, सद्यस्थितीत सोलापुर, नगर आणि पुणे हे तीन जिल्हे मोठे आहेत. सरकारमध्ये असतानादेखील या विषयावर अनेकदा चर्चा झाली. नव्या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा देण्यासाठी मोठ्या अडचणी येत असतात. याआधी झालेल्या जिल्ह्यात अद्यापही त्या मिळु शकल्या नाहीत. त्याकरिता लागणारा पैसादेखील उपलब्ध होत नाही. 

पालकमंत्री शिंदे यांनी जिल्हा विभाजनावर भाष्य केले असले तरी खरच विभाजन होणार आहे का. मुख्यमंत्र्यांनी तसा धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित असते. त्याची फाईल तयार व्हावी लागते. नुसत्या घोषणा करुन उपयोग नसतो. मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय खरंच घेतला आहे का याची माहिती माझ्याकडे नाही ती येथील भाजपचे नेते राजेश चौधरी यांनी घ्यावी. 
----------------------------
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा Ahmednagarlive24 App https://goo.gl/A1KePS 
-------------------------------
जिल्हा विभाजन होऊन संगमनेर नवा जिल्हा व्हावा या मताचा मी आहे. खरंच विभाजन होणार असेल तर मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही म्हणत असाल तर पुढे असेल, म्हणत असाल तर सोबत राहील. जिल्ह्याचे विभाजन झाल्यास संगमनेरच नव्या जिल्ह्यासाठी योग्य ठिकाण आहे. येथून वीस मिनीटाच्या अंतरावर विमानतळ आहे. 

पुणे नाशिक मार्ग चौपदरी झाला. जिल्हा मुख्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या अद्यावत इमारती येथे उपलब्ध आहेत. न्यायालयाचीदेखील भव्य इमारत तयार झालीय. लवकरच रेल्वेमार्ग होतोय, निळवंडेमुळे मुबलक पाणीदेखील उपलब्ध असुन संगमनेरसारखे दुसरे कोणते सर्वसोयीने युक्त ठिकाण आहे असा सवाल केला. राजेश चौधरी, प्रशांत वामन, शौकत जहागिरदार, अशाेक सातपुते, दुर्गा तांबे यांनीदेखील आपली भुमिका मांडली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.