सराफास लुटणाऱ्या आरोपींकडून १० तोळे सोने हस्तगत.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : नगर तालुक्यातील खडकी येथील सराफास लुटणाऱ्या आरोपींकडून नगर तालुका पोलिसांच्या पथकाने १० तोळे सोने व अर्धा किलो चांदीचे दागिने हस्तगस्त करण्याची कारवाई केली आहे. या आरोपींकडून आणखी १० तोळे सोने हस्तगत करणे बाकी असल्याची माहिती नगर तालुका पोलिस ठाण्याचे प्रमुख स.पो.नि. किशोरकुमार परदेशी यांनी दिली.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २ जानेवारी रोजी खडकी (ता. नगर) येथील रिद्धी अलंकार या सोने-चांदी दागिने विक्रीच्या दुकानाच्या मालकांना दोन दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी काठीने मारहाण करून त्यांच्या जवळील २० तोळे सोन्याचे तर अर्धा किलो चांदीचे दागिने बळजबरीने हिसकावून घेवून चोरून नेले आहे. याप्रकरणी दि. ३ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
दि. ५ फेब्रुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपींना सुरत, मुंबई, अंकलेश्वर येथून ताब्यात घेवून नगर तालुका पोलिस ठाण्यात हजर केले. सहा.पोलिस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार पोलिस उपनिरीक्षक डी. आर. नेरकर यांनी गुन्ह्याचा तपास करून आरोपी किरण गोवर्धन निकम (वय २१), अविनाश बाळासाहेब आरवे (वय २२, दोघे रा. घोसपुरी, ता. जि.नगर) यांच्याकडून दहा तोळे सोने व अर्धा किलो चांदीचे दागिने हस्तगत केले. या गुन्ह्यातील आणखी १० तोळे हस्तगत करणे बाकीचे आहे. ही कारवाई पथकामधील पोना.आनंद सत्रे, पोना. साबीर शेख, पोकॉ. विनोद पवार, पोकॉ. संदीप जाधव, मपोकॉ. लता पुराणे यांचा सहभाग होता.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.