जिल्ह्याचे विभाजन झाल्यास संगमनेर मुख्यालय व्हावे - माजीमंत्री पिचड.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यास संगमनेर हे जिल्हा मुख्यालय व्हावे, अशी प्रतिक्रिया माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड यांनी दिली.पिचड पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले की, अहमदनगर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या मोठे क्षेत्रफळ असणारा जिल्हा असून याचे विभाजन उत्तर-दक्षिण असे झाले पाहिजे.यामध्ये संगमनेर,अकोले तालुक्याचेही विभाजन होणे गरजेचे आहे. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
उत्तर नगर जिल्ह्यासाठी संगमनेर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. संगमनेरला यासाठी आवश्यक अस्थापना कार्यालय उभे करण्यासाठी जागा इमारती सहज उपलब्ध होऊ शकतात. जिल्हा दर्जाची अनेक कार्यालय देखील येथे आहेत. अकाले तालुक्यातील घाटघर-तिरडे-बिताका-बेलापूर-बारीच्या आदिवासी माणसाला संगमनेर हे अत्यंत सोयीचे मुख्यालय आहे. तेव्हा संगमनेर जिल्हा व्हावा असे वाटते,असेही म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यावेळी जिल्हा बॅँकेचे चेअरमन सिताराम गायकर, जि.प.अर्थ व बांधकाम समिती सभापती कैलास वाकचौरे, मधुकर नवले, मिनानाथ पांडे, यशवंत आभाळे, सुरेश गडाख, विकास शेटे आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.