खून झालेल्या मुलीच्या कुटुंबियांना आरोपीच्या भावाकडून दमबाजी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ येथील खुन झालेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या कुंटूबियासह आजुबाजुच्या नागरीकांना आरोपी संजय गोपीनाथ बर्डे याचा भाऊ दमबाजी करत असल्याने यास सहआरोपी करुन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी राहुरी पोलिस ठाण्यात टाकळीमियॉ भागातील अनेक महिला व नागरीकांनी ठिय्या दिला होता.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
तालुक्यातील टाकळीमियॉ मुसळवाडी तलाव परिसरात अदिवासी सामजाच्या अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खुन करुन तिचे प्रेत उसात टाकून दिले होते. पोलिसांनी धागेदोरे मिळवत जलदगतीने तपासाची चक्र फिरवली तसेच आरोपी संजय बर्डे यास बेड्या ठोकल्या. त्यास न्यायालयाने ११ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र या आरोपीचा भाऊ मयत अल्पवयीन मुलीच्या कुटूंबियास त्यांच्या राहत्या घरी येवून दमबाजी करुन ठार मारण्याची धमकी देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

यामुळे या कुटूबियास पोलिस संरक्षण देण्यात यावे. तसेच आरोपीच्या भावास आरोपी करावे अशी मागणी करत टाकळीमियॉ, मुसळवाडी भागातील नागरीकांनी पोलिस स्टेशनच्या आवारात आज गुरुवारी दुपारी ठिय्या आंदोलन केले होते. पोलिस प्रशासनाने संबंधीताविरोधात पोलिसात कारदेशीर तक्रार द्या, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आंदोलनकर्त्यांना सांगितले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
आंदोलक महिला यावेळी बोलताना म्हणाल्या की, या परिसरात मोठी दहशत पसरली असून आम्हाला जनावरांना चारा आणण्यासाठी जाणेही धोक्याचे ठरत आहे. भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधीतावर कडक कारवाई करावी,अशा मागणीचा अंदोलकाकडून जोर धरण्यात आला. यावेळी दिलेल्या निवेदनावर अनेक महिला व ग्रामस्थांच्या सह्या व अंगठे आहेत. पोलिस प्रशासन यावर काय कारवाई करणार? याकडे टाकळीमियॉ परिसरातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.