जिल्हा विभाजनाची दिलेली 'कमिटमेंट' मी पूर्ण करून दाखवणारच - प्रा. राम शिंदे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : 'जिल्हा विभाजनाच्या मागणीचा व भावनेचा मागील २५ वर्षात फक्त खेळच केला गेला आहे. त्यांचे (दोन्ही काँग्रेस) तीन-तीन मंत्री असताना ते याबाबत काही करू शकले नाहीत', अशी टीका पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी केली. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
'राज्यातील भाजप सरकारने ज्या घोषणा केल्या, त्या करूनच दाखवल्या आहेत. त्यामुळे जिल्हा विभाजनाची दिलेली 'कमिटमेंट' मी पूर्ण करूनच दाखवणार आहे', असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. 'निवडणुकीपूर्वी हे जिल्हा विभाजन होईल, पण कोणत्या निवडणुकीपूर्वी होईल, हे आता सांगणार नाही', अशी टिपणीही त्यांनी आवर्जून केली.

कर्जत-जामखेड तालुक्यातील विविध कार्यक्रमांना जात असताना प्रा. शिंदे बुधवारी दुपारी काहीकाळ येथील शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यावेळी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना, 'जिल्हा विभाजनाच्या माझ्या घोषणेला शासनाचा पाठिंबा आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
राज्याचे महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनीही तशी स्पष्ट ग्वाही दिली आहे. त्यामुळे हे जिल्हा विभाजन होणारच आहे. नव्या जिल्ह्याच्या मुख्यालयाबद्दल वाद असल्याचे सांगितले जाते, पण मला तसे काही वाटत नाही. तरीही याबाबत सर्व लोकप्रतिनिधी व प्रमुख लोकांचे म्हणणे ऐकून यथायोग्य व सर्वमान्य निर्णय घेऊ', असेही प्रा. शिंदे यांनी स्पष्ट केले.

जिल्हा विभाजनाचे वचन मी दिल्यावर यासाठीच्या ५०० कोटीच्या खर्चाचे नियोजन अवघड नाही', असे सांगून प्रा. शिंदे म्हणाले, 'पूर्वी जिल्ह्यात तीन-तीन मंत्री असताना निर्णय होत नव्हता. त्यांच्या भांडणात विभाजन रखडले होते. पण आता मी एकटाच मंत्री आहे व आता भांडणे करणारे कोणी नाही. 

शिवाय मी मनावर घेतल्याने विभाजन होणारच आहे. जिल्ह्याचे मोठे भौगौलिक क्षेत्र असल्याने प्रशासनाला अडचणीचे होते. त्यामुळे विभाजन गरजेचे आहे', असेही त्यांनी स्पष्ट केले.तसेच जिल्ह्यातील राजूर, तिसगाव, देवळालीप्रवरा वा अन्य नव्या तालुका मागण्यांबाबतही जिल्हा विभाजनाच्या वेळी विचार होईल', असेही त्यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.