चारा छावण्यातील अनियमिततेबाबत बाळासाहेब नाहाटासह 80 जणांवर गुन्हे दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- 2012 व 2014 दरम्यानच्या दुष्काळात श्रीगोंदा तालुक्‍यातील जनावरांच्या चारा छावण्यांमध्ये संबंधित संस्था व संस्थाचालकांनी केलेल्या अनियमिततेसंदर्भात तब्बल 81 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस ठाण्यात आठ मंडलाधिकाऱ्यांच्या तक्रारींवरून ही कारवाई करण्यात आली आहे.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये श्रीगोंदा बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा, पंचायत समितीचे माजी उपसभापती गणपतराव काकडे, सिद्धेश्‍वर देशमुख, बेबीताई मगर, ज्ञानदेव कोल्हटकर, भास्कर वागस्कर, रावसाहेब गायकवाड, काका गायकवाड, विलास लाकूडझोडे, देवराम शेळके, निवास नाईक, शोभा धस, दिलीप भोस, बाळासाहेब उगले, आदी बड्या असामींचा समावेश आहे.

या प्रकरणाची पार्श्‍वभूमी अशी, श्रीगोंदा तालुक्‍यात 2012 ते 2014 दरम्यान जिल्ह्यातील सर्वाधिक चारा छावण्या होत्या. तालुक्‍यातील विविध संस्थांनी या चारा छावण्या चालविल्या होत्या. या चारा छावण्यांच्या चालकांनी शासनाने जारी केलेल्या नियम व सूचनांची अंमलबजावणी न करता मनमानी पद्धतीने त्या चालविल्याची तक्रार होत होती. यासंदर्भात न्यायालयात रिटपिटीशन (जनहित याचिका) दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्देशानुसार अखेर सरकारला या चारा छावण्यांवर कारवाईचे पाऊल उचलावे लागले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
श्रीगोंदा तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्‍यातील तब्बल 81 सहकारी व अन्य संस्था तसेच या संस्थेने छावणी चालविण्याचे अधिकार दिलेल्या व्यक्‍तींविरुद्ध श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 188 प्रमाणे अनियमिततेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यात तालुक्‍यातील अनेक बडी मंडळी व वजनदार असामींचा समावेश आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.