पाणीपट्टी दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नागरिकांच्या जीवनावश्यक असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या करात स्थायी समितीने केलेल्या दरवाढीच्या शिफारसीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महापालिकेत धरणे आंदोलन करण्यात आले. तर ही दरवाढ होऊ देणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला. आयुक्त विलास वालगुडे यांना निवेदन दिले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
नगरसेवक कुमारसिंह वाकळे, राष्ट्रवादीचे गटनेता संपत बारस्कर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, माजी उपमहापौर दीपक सुळ, अजिंक्य बोरकर, साहेबान जहागीरदार, गजेंद्र भांडवलकर, सारंग पंधाडे, प्रकाश भागानगरे, प्रा.बबनराव गाडेकर, हनिफ जरीवाला, जॉय लोखंडे, फारुक रंगरेज, निलेश बांगरे, लकी खुबचंदानी, सतीश ढवण, स्वप्निल ढवण, प्रशांत ढलपे, योगेश सोबले, दिपक खेडकर, नितीन लिगडे आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

स्थायी समितीने पाणीपट्टीत एक हजार रुपयाची केलेली दरवाढीची शिफारस अन्यायकारक आहे. शहरात एक लाखाच्या वर मालमत्ता धारक असून, त्यापैकी ५३ हजार मालमत्ताधारकांना पाणीपट्टीची आकारणी केली जाते. यामुळे शहरात ३५ ते ४० टक्के अनाधिकृत नळ कनेक्शन असल्याने स्पष्ट होत आहे. शहरातील अनेक हॉटेल मालक व व्यावसायिकांनी अनाधिकृत नळ कनेक्शन घेतले असून, यामुळे वर्षानुवर्षे महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

या विषयावर महासभेत वारंवार चर्चा होऊनही उत्पन्न वाढीसाठी अनाधिकृत असलेले नळ कनेक्शन अधिकृत करण्याबाबत ठराव घेऊन देखील यावर प्रशासनाने कार्यवाही केली नाही. प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा आर्थिक फटका नागरिकांना बसत आहे. महापालिका आर्थिक अडचणीत सापडली असताना याचा परिणाम मनपाच्या दैनंदिन कामकाजावर होत आहे. तसेच मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने नगरकरांना मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने ही दरवाढ करणे उचित ठरणार नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.