नगरच्या तरुणाचा मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- धर्मा पाटील या वयोवृद्ध शेतकऱ्याच्या आत्‍महत्‍येनंतर नगरच्या अविनाश शेटे या २५ वर्षीय तरुणाने देखील मंत्रालयाबाहेर आत्‍मदहनाचा प्रयत्‍न केला. पोलिसांनी तातडीने अविनाशला ताब्‍यात घेतल्‍याने पुढचा अनावस्‍था प्रसंग टळला. दरम्‍यान, अविनाशच्या पेपरची फेरतपासणी करून त्‍याला न्याय देण्यात येईल, असे आश्वासन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले आहे.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
मंत्रालयात सध्या आत्‍महत्‍या करण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढतच चालली आहे. धुळे जिल्‍ह्यातील धर्मा पाटील यांनी नुकतीच विषप्राशन करून आत्‍महत्‍या केली. शुक्रवार, २ फेब्रुवारी रोजी सोलापूर जिल्‍ह्यातील २८ वर्षीय मारुती धावरे हा तरुणदेखील मंत्रालयात विषाची बाटली घेऊन आला होता. पोलिसांनी त्‍याला गेटवरच अडवले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

बुधवारी सकाळी अविनाश शेटे हा मंत्रालयात आला. अहमदनगरच्या अविनाशने कृषी अधिकारी म्‍हणून परीक्षा दिली होती, मात्र यानंतर परीक्षेबाबत सरकार काहीच निर्णय घेत नाही त्‍यामुळे अविनाश सातत्‍याने मंत्रालयाच्या चकरा मारत होता. काहीच होत नाही हे पाहून अविनाशने मंत्रालयाच्या गार्डन गेटच्या बाहेर स्‍वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्‍न केला. मात्र, पोलिसांनी तत्‍काळ हस्‍तक्षेप केल्‍याने पुढील अनावस्‍था प्रसंग टळला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.