कारची धडक बसून महाविद्यालयीन तरुणी ठार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- रस्त्याच्या कडेला एसटी बसच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या महाविद्यालयीन तरुणीला भरधाव स्विफ्ट कारची जोराची धडक बसून तिचा जागेवरच मृत्यू झाला. अश्विनी वैजिनाथ काळे (२२, काळे वस्ती, देशमुखवाडी, ता. कर्जत) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
बुधवारी सकाळी आठ वाजता राशीन-कर्जत रस्त्यावर देशमुखवाडी शिवारात ही घटना घडली. मनोहर दत्तात्रय पोटरे (पोटरे वस्ती, देशमुखवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक बारीकराव भगवान रासकर (४५, निमगावडाकू, ता. कर्जत) याच्याविरोधात राशीन पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयात बीएच्या तृतीय वर्षात शिकणारी अश्विनी सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी देशमुखवाडी बसथांब्यावर थांबली होती. कर्जतच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या मारुती स्विफ्ट कारची (एमएच - १४, एफजी २५७०) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अश्विनीला जोराची धडक बसली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

या धडकेत तिचा जागेवरच मृत्यू झाला. काही प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले की, अश्विनीला बसलेली धडक इतकी जोराची होती की, ती उंच उडून डोक्यावर आदळली. त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर इजा होऊन तिचा जागेवरच मृत्यू झाला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.