आमदार आजारी पडल्यास माझी ओपीडी खुली - डॉ . सुजय विखे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर दाक्षिणेवर स्वारी करण्यास निघालेल्या डॉ सुजय विखे यांनी पारनेर तालुक्याचे आमदार विजय औटी यानी दत्तक घेतलेल्या व सेनेचे जि .प . सदस्य असलेल्या कर्जुले हर्या ( ता .पारनेर ) येथे आपला पहिलाच कार्यक्रम घेऊन राजकिय इंजेक्शन टोचले. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हे महाअरोग्य शिबीर एक दमदार ऐंट्री मानली जाते येथील शिबीराचे उद्घाटन डॉ सुजय विखे यांच्या हस्ते झाले त्या प्रसंगी ते बोलताना म्हणाले की खासदार विखे पाटलांच्या जनसेवेचा वारसा जपतोय गेल्या अर्ध्या शतकापासुन विखे पाटील परिवाराने जनसेवेचा वसा आणी वारसा घेतलेला आसून तोच वसा आणी वारसा जपण्याचे काम आपण करत आहोत डॉं विखे पाटील मेमोरियल हॉस्पीटल मेडिकल कॉलेज विळद घाट अहमदनगर व जनसेवा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अयोजीत शिबीरात सुमारे दोन हजाराचा वर रुग्णाची मोफत तपासणी करण्यात आली.

डॉ . विखे पुढे बोलताना म्हणाले की मी डॉक्टर आहे. जनसेवेचा वसा घेतला आहे त्यामुळे मी माझ्या व्यवसायात कधी राजकारण करत नाही. शासनाच्या सोयी सुविधा तळागाळातील सर्व सामान्य नागरिका पर्यन्त पोहचल्या पाहीजेत त्यासाठी आपण लवकरच पारनेरला संपर्क कार्यालय सुरू करणार आहोत. गावागावातील युवकांचे संघटन तयार करून सर्व सामान्याचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करू. 

यावेळी व्यासपीठावर पं.स सदस्य दिनेश बाबर बाजार समितीचे संचालक खंडू भाईक , संतोष शिंदे , महेश शिरोळे , अण्णा हजारे युवा मंचचे अध्यक्ष राहुल शिंदे . मेजर रविंद्र रोकडे , कारभारी आहेर कर्जुलेचे सरपंच साहेबराव वाफारे , भाऊसाहेब डेरे , शैलेश औटी माजी पंस उपसभापती उमाजी वाळुंज आदी मान्यवरासह विविध गावचे सरपंच उपसरंपच उपास्थित होते सुत्रसंचालन प्रा . मधुकर बर्वे यानी केले तर आभार डॉ . भाऊसाहेब खिलारी यांनी मानले. 
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.