राहुरीतील त्या मुलीचा बळी अंधश्रध्देतुन ?

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी तालुक्यातील टाकळीमिया शिवारात मुंडके, हात व पाय नसलेला अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आठवडा भरापासून गायब झालेल्या या मुलीचा मृतदेह चंद्रग्रहणानंतर सापडल्याने तिचा अंधश्रद्धेतून बळी दिल्याचा संशय व्यक्‍त होत आहे. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
टाकळीमिया शिवारात मृतदेह सापडलेल्या १३ वर्षांच्या मुलीचा गळा आवळून खून करण्यात आला असल्याचे शवविच्छेदन अहवालात मंगळवारी स्पष्ट झाले. खून करण्यापूर्वी या मुलीवर अत्याचार झाला की नाही, याबाबतचा अहवाल येण्यास मात्र आणखी वेळ लागेल. हात, पाय व तोंड नसलेला मृतदेह सोमवारी आढळला. हा मृतदेह आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांच्या हाती अद्याप काहीच लागलेले नाही.

टाकळीमिया येथील मुसळवाडी तलावाजवळ रहात असलेले रोहिदास वाघ यांची मुलगी मागील आठ दिवसांपासून बेपत्ता होती. आई-वडिलांनी शोध घेऊनही उपयोग लागला नाही. सोमवारी सकाळी परिसरातील महिला तलावालगत सतीश शंकर सोनवणे यांच्या उसाच्या शेतात गवत कापण्यासाठी गेली. त्यावेळी तिला मृतदेह दिसला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
प्राथमिक तपासात पोलिसांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. मुलगी आठ दिवसांपासून बेपत्ता आहे, अशी कोणतीही तक्रार संबंधित मुलीच्या आई-वडिलांनी दिलेली नव्हती. शवविच्छेदनाचा लेखी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या प्रकरणाच्या पुढील तपासाला गती मिळणार असल्याची माहिती राहुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.