मी कुठेही लढायला तयार आहे; लोकसभा, विधानसभेस कोण हे ठरवून घ्या - प्रताप ढाकणे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- स्वत:च्या अस्तित्वासाठी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवणार आहोत. सारकार कोणाचेही असो, शेतकरीहिताचे नाही. या जिल्ह्यात प्रस्थापित आणि विस्थापित संघर्ष कायम राहिला आहे, असा या जिल्ह्याचा इतिहास आहे, असे प्रतिपादन केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन ॲड. प्रताप ढाकणे यांनी केले. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
आगामी लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवार कोण हे आधी भाऊ, काकांना (घुले, ढाकणे) ठरवून घ्यावे लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप ढाकणे यांनी सूचित करुन चर्चेला जाहीर रुप दिले. मी कुठेही लढायला तयार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खरवंडी कासार येथील बैठकीत ते बोलत होते. या वेळी सीताराम बोरुडे, किरण खेडकर, राजेंद्र जगताप, राजेंद्र हिंगे, आर. आर. ढाकणे, अनिल जाधव, वसंत खेडकर, महारुद्र कीतने, शहादेव कीतने, मोहनदादा ढाकणे, विनायक कीतने, महादेव दराडे, कानिफ सोनवने, दिलीप पवळे, अंबादास राऊत, शैलेंद्र दहिफळे, वैभव दहिफळे, रामजी ढाकणे, शिवनाथ ढाकणे, पांडुरंग गायकवाड आदींसह भालगाव गटातील ग्रामस्थ उपस्थित होते. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
या वेळी ढाकणे म्हणाले, ही लढाई माझी वैचारिक असून, तुम्हीच माझी ताकद आहात. निर्णय घेताना तुमच्या भावना मला जाणून निर्णय घ्यावयाचा आहे. मी जीवनात वीस वर्षे संघर्ष केला. अपयशाचा सामना करत सतत जनसंपर्कात राहून जनतेच्या सुख दु:खात सहभागी झालो. राजकारणात इतरांसाठी खूप केले. जेव्हा माझा राजकीय प्रश्न निर्माण झाला, मदतीला मात्र कोणी आले नाही. आता ही लढाई स्वत:च्या अस्तित्वाची आहे, तुम्हीच निर्णय द्या, निवडणूक कोणती लढवायची.

या वेळी भारजवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब बटुळे, ढाकणवाडीचे सरपंच राजेंद्र ढाकणे, खरवंडी कासारचे माजी उपसरपंच राजेंद्र जगताप, मुंगूसवाडचे सरपंच राजेंद्र हिंगे, मोहनदादा ढाकणे, महारुद्र कीतने आदींनी प्रताप ढाकणे हाच आमचा पक्ष असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. किरण खेडकर यांनी आभार मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.