पालकमंत्री राम शिंदे यांच्या पाठबळावरच जामखेडमध्ये दहशत !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भरदिवसा शहरात झालेल्या गोळीबार प्रकरणातील सर्व आरोपीं विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करावी. या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराचाही पोलिसांनी शोध घ्यावा. पालकमंत्री राम शिंदे यांच्या पाठबळावरच काही गुंड प्रवृत्ती जामखेड शहरात दहशत पसरवण्याचे काम करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात यांनी केला.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याच्या निषेधार्थ मंगळवारी दुपारी 1 वा तहसील कार्यालयासमोर मूक मोर्चा काढण्यात आला. इदगाह मैदान येथून शासकीय गोडाऊनजवळून हा मूक मोर्चाकाढण्यात आला. मोर्चा बसस्थानकाजवळून, नगररोड, खर्डा चौक, जयहिंद चौक, बीड रोड कार्नर मार्गेतहसील कार्यालयावर पोहचला. यानंतर मोर्चाचेरूपांतर भाषणात झाले.यावेळी राळेभात बोलत होते.

राळेभात यावेळी म्हणाले, हा मूकमोर्चा असला तरी आपण बोललो नाही तर समजणार कसे, जामखेडला कोणताही अधिकारी थांबण्यास तयार नाही. कारण पालकमंत्र्यांचे कार्यकर्ते अधिकाऱ्यांना दमबाजी करतात. हा हल्ला मुस्लीम समाजावर झाला नसून गावावर झालेला हल्ला आहे. गोळीबारामागेकटकारस्थान आहे, असाही आरोप त्यांनी केला.

गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याला जात नसते. जामखेड शहरात भरदिवसा गोळीबार होतो यामुळे जामखेडचे बिहार होण्यास वेळ लागणार नाही. जामखेड तालुक्‍यात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. पोलीस स्टेशनला कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने गुन्हेगारांवर कोणाचाही वचक राहिला नाही. माणसावर गोळ्या झाडून राजकारण होत नाही. पालकमंत्र्यांच्या तालुक्‍यात दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या जातात ही दुर्दैवी घटना आहे. 

फक्‍त दोन आरोपींना अटक न करता मुख्य आरोपींना अटक करून कारवाई करण्यात यावी. गावगुंडांकडून शहरात दहशत निर्माण करुन पैसा गोळा करण्याचे काम सुरू आहे. आरोपींकडे गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे कोठून आली याची चौकशी करण्याची करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी गोळीबार प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सूत्रसंचालन अमजद पठाण यांनी केले. आभार जमीर सय्यद यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.