शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास सरकारला अपयश - पांडुरंग अभंग

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या औरंगाबाद येथील मोर्चाची भिती सरकारला वाटली म्हणूनच परवानगी दिली नाही. ज्यांना ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नाची जान आहे अशा शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा पक्ष आहे. ग्रामीण भागातील जनता या सरकारच्या निर्णयामुळे हैराण झाली आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव देण्याच्या फक्त गप्पा मारत असल्याचे प्रतिपादन माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी नेवासा येथे हल्लाबोल आंदोलन कार्यकर्त्यांच्या नियोजन बैठकीत केले.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर चालू असलेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या नियोजनासाठी नेवासा तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील, माजी जि.प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आ. पाडुरंग अभंग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.लंघे म्हणाले, आता जनता खूप हुशार झाली आहे. या थापा मारणाऱ्या सरकारला जनता निश्चितच खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
भविष्यात नेवासा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भक्कम करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी येत्या १५ फेब्रुवारी रोजी शेवगावला अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आहे. त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.