श्रीरामपूर जिल्हा मुख्यालयासाठी स्व.आदिक यांनी पूर्वतयारी करून ठेवली होती !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जिल्हा विभाजनानंतर श्रीरामपूरला मुख्यालय करण्याच्या दृष्टीने गोविंदराव आदिक यांनी सर्वच प्रमुख प्रशासकीय कार्यालये शहरात आणली. त्यादृष्टीने आदिक यांनी पूर्वतयारी करून ठेवली, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी केले.राहुरी येथे 15 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात तालुक्‍यातून अधिकाधिक कार्यकर्त्यांना सहभागी करून घेण्यासाठी कॉंग्रेस भवन येथे बैठक घेण्यात आली. त्यात ते बोलत होते.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
यावेळी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सबाजीराव गायकवाड, नगरसेवक राजेंद्र पवार, तालुकाध्यक्ष सुरेश ताके, शहराध्यक्ष लकी सेठी, महिला शहराध्यक्षा अर्चना पानसरे, कामगार नेते नितीन पवार, युवक शहराध्यक्ष योगेश जाधव आदी उपस्थित होते.

आदिक म्हणाले की, भंडारदरा धरणातून तालुक्‍याला हक्काचे 51 टक्के पाणी मिळणे आवश्‍यक आहे. यंदा पाऊसमान चांगला असला तरी निळवंडे धरणाची कालवे पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न बिकट होणार आहे. शहराच्या औद्योगिक विकासाचे प्रश्‍न प्रलंबित असून युवकांना रोजगार राहिलेले नाहीत.
राज्य सरकारकडून शहर विकासासाठी नगरपालिकेला निधी मिळवून दिला. मात्र पुढचे सरकार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच असणार आहे. त्यावेळी सर्वच कामे मार्गी लागतील. त्यासाठी पक्षाला बळकट करण्याच्या दृष्टीने राहुरी येथील हल्लाबोल आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यावेळी नगराध्यक्षा आदिक, नगरसेवक राजेंद्र पवार, केतन खोरे, लकी सेठी, योगेश्‍वरी उंडे, आकाश क्षीरसागर आदींची भाषणे झाली. यावेळी भाऊसाहेब वाघ, हंसराज आदिक, गणेश ठाणगे, राम टेकावडे, कारभारी बडाख, कैलास बोर्डे, प्रशांत खंडागळे, सुनील थोरात, विजय खाजेकर, नजीर मुलानी, सरवर अली सय्यद, डॉ.विलास आढाव, जयंत चौधरी, अण्णा पतंगे, विजय शिंदे आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.