विषारी औषध प्राशन करून विवाहितेची आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील पारेगाव गडाख येथील एका तीस वर्षीय विवाहित महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपविली. उषा संतोष गडाख (वय ३०) असे या विवाहितेचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
पारेगाव गडाख येथील विवाहिता उषा संतोष गडाख हिचा नवीन घर बांधण्यासाठी माहेरून चार लाख रुपये आणावेत या मागणीसाठी पती संतोष शिवाजी गडाख हा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. पतीच्या त्रासाला कंटाळून उषा हिने शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपविली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
याप्रकरणी मयत उषा गडाख हिचा भाऊ विठ्ठल साहेबराव घोटेकर (रा. घोटेकर वाडी, ता. सिन्नर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी पती संतोष शिवाजी गडाख याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस अधिक तपास करीत आहे. रविवारी दुपारी मयत उषा गडाख हिच्या मृतदेहावर पारेगाव गडाख येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.