ग्रामस्थांनी पकडलेल्या आरोपीला पोलिसांनी सोडले !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वाहनचालकांना चाकूचा धाक दाखवून पाच हजारांची लूट करणाऱ्या आरोपींना ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिले; परंतु पोलिसांनी आरोपींना पळून ज़ाण्यास मदत केल्याचा आरोप जवळा येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांनी केला आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
याबाबतची माहिती अशी की, ज़वळा येथील घोडोबा फाटा येथे रविवारी रात्री नऊच्या सुमारास कांद्याने भरलेला ट्रक अडवून चालकांना चाकूचा धाक दाखवत पाच हजारांची लूट करणाऱ्या दोघांपैकी एकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांना पाचारण केले. मात्र, पोलिसांनी ताब्यात दिलेल्या आरोपींना पळून जाण्यास मदत केली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तसेच ज़्यांनी आरोपींना पकडून दिले त्यांच्याविरुध्दच् वाहनचालकास गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी सुचविले, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांनी केला आहे. याबाबत घावटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना निवेदन देऊन संबधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा घावटे यांनी दिला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.