मनपाच्या सत्तेत भाजप अस्वस्थ; गांधी गटाचे नगरसेवक सत्तेतून बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत.

दिव्य मराठी अहमदनगर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेने केलेल्या टीकेनंतर भाजपमध्ये मोठी अस्वस्थता पसरली असून, भाजप सत्तेतून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहे. लवकरच शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांच्याबरोबर भाजपचे नाराज नगरसेवक बैठक घेऊन त्यात सत्तेतून बाहेर पडण्याची मागणी करणार असल्याचे समजते. दरम्यान, सत्तेतून भाजप बाहेर पडल्यास महापालिकेत माेठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. अवघ्या आठ महिन्यांवर महापालिकेची निवडणूक येऊन ठेपली असताना राजकीय अस्थिरता सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राज्यात शिवसेना-भाजप सत्तेवर आहेत. नगरच्या महापालिकेतही शिवसेना-भाजप एकत्रित सत्तेवर आहे. शिवसेनेकडे महापौरपद, तर भाजपकडे उपमहापौर पद आहे. मात्र सत्तेवर असताना सेना-भाजपचे कधीच पटले नसल्याचे अनेकदा समोर अाले आहे. सत्तेत असतानाही भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांना घनकचऱ्याच्या निविदेवरून आंदोलन करावे लागले. भाजपने घनकचरा निविदेला विरोध केला होता, तरीदेखील निविदांना मंजुरी देण्यात आली.

त्यावेळी आयुक्तांवर दबाव आणून स्वाक्षऱ्या केल्याचे वक्तव्य छिंदम यांनी केले होते. महापालिकेच्या सभांनादेखील उपमहापौर व्यासपीठावर न बसता खाली नगरसेवकांमध्ये बसून प्रश्न मांडतात. महापालिकेत होणाऱ्या बैठकांनादेखील शिवसेनेकडून भाजपच्या नगरसेवकांना साधे निमंत्रण देखील दिले जात नाही. ज्या दिवशी बैठक असेल त्याच्या आदल्या दिवशी हे निमंत्रण दिले जाते. त्यामुळे भाजपचे नगरसेवक नाराज आहेत.

त्यातच महत्त्वाचा निर्णय घेताना शिवसेना भाजपचे उपमहापौर, गटनेते व नगरसेवकांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. त्यातच पथदिव्याच्या घोटाळ्यात शिवसेनेबरोबर भाजपही भरडला जात अाहे. घोटाळ्यात आमचे नाव नको, म्हणून शिवसेनेबरोबर सत्तेत न राहण्याची भूमिका भाजपच्या बहुतांशी नगरसेवकांनी घेतली आहे. शहरातील भुयारी गटार योजनेसाठी १३६ कोटी व अमृत योजनेसाठी १०० कोटींचा निधी मनपाने मिळवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निधी महापालिकेला दिला असताना शिवसेनेच्या नगरसेवकांने थेट मुख्यमंत्र्यांवरच टीका केली. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांच्या नाराजीत आणखीनच भर पडली. महापालिकेत शिवसेना जाणीवपूर्वक भाजपला डावलत असल्याची भावना भाजपमध्ये आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सध्या महापालिकेत भाजपचे गांधी व आगरकर असे दोन गट आहेत. शिवसेना-भाजपमध्ये जमत नसल्यामुळे त्याचा परिणाम कामांवरही होत आहे. विकासकामांच्या उद्धाटनांना सत्तेत असताना शिवसेना भाजपला बोलवत नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेबरोबर सत्तेत न राहण्याची भुमिका भाजपच्या नगरसेवकांनी निश्चित केली आहे. 

येत्या दोन दिवसांत भाजपचे नगरसेवक शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांच्या उपस्थित बैठक घेऊन आपली भुमिका मांडणार असल्याची माहिती समजली. बैठकीत ते सत्तेतून बाहेर पडण्यावर ठाम राहणार असल्याचे समजते. दरम्यान, सत्तेतून भाजप बाहेर पडल्यास राजकीय उलथापालथ होऊ शकते.दरम्यान, पथदिवे घोटाळ्यावरून सत्ताधारी शिवसेना व भाजपसह विरोधकही आक्रमक झाले आहेत. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

विकासकामे न होण्याला जबाबदार कोण ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच महापालिकेला कोट्यवधींचा निधी मिळाला आहे. मात्र, शिवसेना निधी ज्या मुख्यमंत्र्यांमुळे मिळाला, त्यांच्यावरच टीका करत आहे. एकही ठोस काम झाललेे नाही. विकासकामे होत नसतील, तर त्याला जबाबदार कोण? महापालिकेत अनुशासन राहिलेले नाही.
- सुवेंद्र गांधी, गटनेते, महापालिका.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.