....आधी राजूर तालुक्याची निर्मिती करा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर जिल्ह्याचे विभाजन करून नव्याने कोणताही जिल्हा करा, मात्र तत्पूर्वी राजूर तालुक्याची निर्मिती करा, अशी मागणी राजूर तालुका कृती समितीने केली.माजी जि. प. अध्यक्ष व भाजप नेते अशोक भांगरे यांच्या नेतृत्वाखाली व जि. प. सदस्य डॉ. किरण लहामटे, माजी पं. स. सभापती बाळासाहेब देशमुख, राजूरचे माजी सरपंच काशिनाथ साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी राजूर येथे झालेल्या आदिवासी वधू-वर परिचय मेळावा व राजूर तालुका कृती समितीच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
बैठकीच्या प्रारंभीच राजूर तालुका करावा, या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. विकासाची दारे खुली करून न्याय द्यावा, राजूर तालुका झालाच पाहिजे अशा घोषणा देत बैठकीला सुरुवात झाली. आदिवासींचे कोट्यवधींचे स्वतंत्र बजेट असतानाही आघाडी सरकारने राजूर तालुक्याची निर्मिती केली नाही. मात्र, आता सरकार बदलले असून भाजप सरकारने आदिवासींच्या हिताच्या दृष्टीने राजूर स्वतंत्र तालुका करून राजूरच्या बंद पडलेल्या बाजारपेठेत ऊर्जितावस्था निर्माण करावी, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
राजूर तालुका कृती समितीची मागणी ११० ग्रामपंचायतींचे ठराव घेणार.
राजूर तालुक्याची निर्मिती होण्यासाठी आदिवासी भागातील ११० ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन व मुख्यमंत्री, महसूलमंत्री, पालकमंत्री यांना भेटून शर्थीचे प्रयत्न करू, असे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले. जिल्हा विभाजन होऊन राजूर तालुक्याची निर्मिती होणे आवश्यक आहे. हा निर्णय यापूर्वीच व्हायला पाहिजे होता. १५ वर्षे उलटूनही हा प्रश्न भिजत पडला आहे. तालुक्याचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, असे भाजप नेते अशोक भांगरे यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.