दलित वस्ती योजनेसाठी २ कोटी ५० लाखांचा निधी - सुजित झावरे

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर व भाळवणी या प्रमुख गावांतील ९० वाड्यावस्त्यांच्या दलित वस्ती योजनेसाठी २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सोमवारी दिली.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
या निधीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे अनेक दिवसांपूर्वी पाठवण्यात आला होता. प्रलंबित असलेल्या या निधीला आठ महिन्यांनी मंजुरी देण्यात आली. या योजनेंतर्गत सोमवारी टाकळी ढोकेश्वर येथील बांडेवस्तीवरील रस्त्यांचे काँक्रिटीकरण व दलितवस्ती गटार योजनेचा प्रारंभ झावरे यांच्या हस्ते करण्यात आला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
सरपंच सुनीता झावरे, माजी सरपंच शिवाजी खिलारी, उपसभापती विलास झावरे, नारायण झावरे, डाॅ. भाऊसाहेब खिलारी, खविसंचे उपाध्यक्ष अॅड. बाबासाहेब खिलारी, राजेश भंडारी, किसन धुमाळ, बाळासाहेब खिलारी, मोहनराव रांधवन, मोहन रोकडे, गंगाधर बांडे, संतोष खिलारी, संतोष बांडे, ग्रामविकास अधिकारी संपतराव दातीर आदी यावेळी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.